Muscle And Immunity Health : कमकुवत स्नायूंचा होतो रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम, कशी घ्याल आरोग्याची काळजी

Low Immunity : वाढणारा कोरोना व बदलते हवामान यामध्ये स्नायूंचे आरोग्य जपणे व आपली रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवणे जास्त गरजेचे आहे.
Muscle And Immunity Health
Muscle And Immunity HealthSaam tv
Published On

Health Tips : आजच्‍या धावपळीच्‍या युगात आपण सतत धावपळ करतो आणि व्‍यस्‍त नित्‍यक्रमामध्‍ये गुंतून जाताना आपण आपल्या आरोग्‍याकडे नेहमी दुर्लक्ष करतो. परंतु, वाढणारा कोरोना व बदलते हवामान यामध्ये स्नायूंचे आरोग्य जपणे व आपली रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवणे जास्त गरजेचे आहे.

रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी कोणतेच औषध नसते. असे अॅबॉटच्‍या न्‍यूट्रिशन व्यवसायामधील मेडिकल व सायण्टिफिक अफेअर्सचे प्रमुख डॉ. इरफान शेख स्‍नायूंचे आरोग्‍य (Health) का महत्त्वाचे आहे आणि स्‍नायू शक्तिशाली असल्‍याने रोगप्रतिकाशक्‍ती कशाप्रकारे वाढू शकते याबाबत सांगितले आहे.

Muscle And Immunity Health
Weight And Height Calculate : वयानुसार किती असायला हवे आपले वजन?

1. स्‍नायू आणि रोगप्रतिकारशक्‍ती निर्माण करण्‍यामध्‍ये त्‍यांची भूमिका

स्‍नायू उत्तम आरोग्‍यासाठी महत्त्वाचे आहेत. स्‍नायूंमुळे आपल्‍याला हालचाल करण्‍यास आणि संतुलन राखण्‍ययास मदत होते. खरेतर, यामुळे आपली शक्‍ती कायम राहण्‍यास मदत होते परंतु, खेळ खेळणे, नृत्‍य (Dance) करणे, चालणे अशा कृतींमुळे आपल्या शारीरिक क्षमतेला पाठबळ मिळते. स्‍नायू रोगप्रतिकार पेशी कार्यान्वित करण्‍यामध्‍ये देखील महत्वाची भूमिका बजावतात.

स्‍नायू उती रोगप्रतिकारशक्‍तीला कार्य करण्‍यास आवश्‍यक असलेली ऊर्जा व अॅमिनो आम्‍ल देण्‍यासोबत आपले संसर्गापासून संरक्षण देखील करतात. स्‍नायू तुम्‍ही बरे होत असताना शक्‍ती व ऊर्जेचा महत्त्वपूर्ण स्रोत देखील तयार करतात.

Muscle And Immunity Health
मजबूत प्रतिकारशक्तीसाठी ओमेगा -3 चे 6 स्त्रोत | Immunity Booster Foods

चालणे किंवा खाण्यासारख्या लहान क्रियांमुळे व्यक्तीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. संशोधनाचा विचार करता वृद्धत्वामुळे स्नायूंची झीज होऊ शकते. उदाहरणार्थ, वयाच्या ४०व्या वर्षापासून, प्रौढ व्‍यक्‍तींची स्‍नायूशक्‍ती दर दशकाला ८ टक्‍क्‍यांनी कमी होते आणि वयाच्‍या ७०व्‍या वर्षानंतर हा दर दुप्‍पट होऊ शकतो. आरोग्‍यदायी राहण्‍यासाठी स्‍नायूंचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यासोबत अधिक शक्तिशाली करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे.

2. स्नायू अधिक बळकट बनवण्यासाठी काय कराल ?

स्नायूंची शक्ती कमी होणे हे नैसर्गिक आहे पण त्यांच्या परिणामांकडे दुर्लक्ष करणे हे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे ठरु शकते. कारण रोगप्रतिकारशक्‍तीचे आरोग्‍य स्‍नायूंच्‍या आरोग्‍यावर अवलंबून असते.

Muscle And Immunity Health
Gold Silver Price Hike: लग्नसराईत सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या आजचे दर

तुमच्‍या स्‍नायूशक्‍तीची तपासणी करण्‍यासाठी चेअर चॅलेंज टेस्‍ट सोपा मार्ग आहे. अंदाजे ४३ सेमी (१.४ फूट) उंची असलेल्‍या खुर्चीवर ५ सिट-अप्‍स करण्‍यासाठी लागणरा कालावधी तुम्‍हाला तुमच्‍या स्‍नायूशक्‍तीबाबत माहिती देऊ शकतो.

स्‍नायूशक्‍तीबाबत सर्वोत्तम माहितीसाठी https://muscleagetest.in/ या वेबसाइटला (Website) देखील भेट देऊ शकता. स्‍नायूशक्‍ती वाढवता येऊ शकेल असे ३ सोपे मार्ग पुढीलप्रमाणे

1. शारीरिक व्‍यायामासाठी वेळ (Time) काढा:

नियमित शारीरिक व्‍यायामामुळे स्‍नायूशक्‍ती मजबूत करण्‍याकरिता दीर्घकाळापर्यंत फायदा होऊ शकतो. तुम्‍ही तुमच्‍या दैनंदिन नित्‍यक्रमामध्‍ये चालणे, पोहणे, सायकल चालवणे, जॉगिंग किंवा पायऱ्या चढणे यांसारख्‍या साध्‍या कृतींचा समावेश करत सुरूवात करू शकता.

Muscle And Immunity Health
Digital Marketing Career : डिजिटल क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी, हे कोर्स करा मिळेल लाखोंचा पगार

2. दैनंदिन प्रथिने गरजांची पूर्तता करा:

प्रथिने स्‍नायूशक्‍ती मजबूत करण्‍यासाठी आवश्‍यक आहेत आणि दररोज पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. नियमित २५ ते ३० ग्रॅम प्रथिनांचे सेवन केल्यास स्नायूची निर्मिती होण्यासाठी आहारात मांस, पोल्‍ट्री, मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, टोफू आणि बीन्स यांसारख्या अनेक स्त्रोतांच्‍या माध्‍यमातून प्रथिने मिळवू शकता.

3. पौष्टिक घटक :

चांगले पोषण आणि स्नायूंचे आरोग्य या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. अन्नातूनच तर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा मिळते आणि स्नायूंना ताकद मिळते. यासाठी प्रथिनांसह कॅल्शियम व जीवनसत्व ड असलेला आहार सेवन करणे महत्त्वाचे आहे. स्‍नायूशक्‍ती वाढवण्‍यासाठी प्रथिनांव्‍यतिरिक्‍त तुम्‍ही हिरव्‍या पालेभाज्‍या, दुग्धजन्य उत्‍पादने, मासे, मशरूम्‍स व सोयाबीन यांचे देखील सेवन करू शकता.

Muscle And Immunity Health
Headache On Left Side : पेनकिलर खाऊनही डोकेदुखी थांबत नाही ? असू शकतो हा गंभीर आजार

तसेच, स्‍नायूशक्‍ती वाढवण्‍यासाठी शरीराला बीटा-हायड्रॉक्‍सी-बीटा-मीथाइलबुट्रायरेट (एचएमबी)ची गरज असते, जे शरीर विशिष्ट अमिनो आम्‍लांचे विघटन करते तेव्‍हा नैसर्गिकरित्‍या निर्माण होते. तुम्‍ही याचे प्रमाण कमी असलेले अॅवोकॅडो, द्राक्षे व फुलकोबी यांचे सेवन करू शकता, तसेच तुम्‍ही सप्‍लीमेंट्सचा देखील वापर करू शकता जसे एन्‍शुअर एचएमबी, जे ३२ आवश्‍यक पौष्टिक घटक देते, ज्‍यामुळे स्‍नायूशक्‍ती वाढवण्‍यामध्‍ये मदत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com