White Hair Problem: वयाची विशी ओलांडताच केस पांढरे व्हायला लागलेत? मग या भाजीचा आहारात समावेश कराच, केस होतील काळेभोर-दाट

Bottle Gourd Benefits For Hair : या समस्येवर कितीही महागतले पदार्थांचा वापर केला तरी यापासून आपली सुटका होत नाही.
White Hair Problem
White Hair ProblemSaam Tv
Published On: 

Hair Care Tips : काही काळापूर्वी केस पांढरे होणे हे वाढत्या वयाचे लक्षण मानले जायचे. परंतु, आता केस हे वयाची विशी ओलांडताच पांढरे होऊ लागले आहेत. आजकाल ही समस्या २० ते २५ वर्षाच्या तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे.

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी व वाढत्या प्रदूषणांमुळे केस गळतीच्या अनेक समस्यांना समोरे जावे लागते. या समस्येवर कितीही महागतले पदार्थांचा वापर केला तरी यापासून आपली सुटका होत नाही. पण जर तुम्ही नियमितपणे या भाजीचे सेवन केल्यास तुमचे केस काळेभोर व दाट होतील.

White Hair Problem
Oily Hair Home Remedies : पावसाळ्यात केस तेलकट होतात ? सतत केसांना खाज लागते ? स्वयंपाकघरातील या नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन पाहाच !

1. दुधी भोपळ्याचे तेल लावा

  • जर तुमचे केस (Hair) लहान वयातच पांढरे होऊ लागले असतील तर त्यासाठी घरीच दुधी भोपळ्याचे तेल (Oil) तयार करा. यासाठी तुम्हाला खोबरेल तेल लागेल.

  • दुधी भोपळ्याची साल काढून त्याला सुमारे एक आठवडा उन्हात वाळवा,

  • आता एका कढईत सुमारे 250 ग्रॅम खोबरेल तेल घेऊन ते गरम करा.

  • नंतर या गरम तेलात दुधी भोपळ्याचे सुकवलेले साल टाका. त्यानंतर सुमारे 15 ते 20 मिनिटे शिजवल्यानंतर ते उकळा, तेल गॅसवरून काढून टाका आणि थंड होण्याची प्रतीक्षा करा.

  • झोपण्यापूर्वी केसांना मसाज करताना हे तेल लावा आणि सकाळी केस धुवा.

  • असे नियमित केल्याने तुमचे केस काळे होण्यास मदत होईल.

White Hair Problem
Ishita Dutta : अधीर झालो तुझ्या दिसण्याने, बेभान झालो तुझ्या हसण्याने

2. दुधी भोपळ्याचा रस प्या

दुधी भोपळ्यात पाण्याचे प्रमाण खूप जास्त असून त्यात कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे (Vitamins) आढळतात. हे आपल्या शरीराला डिटॉक्स करते, ज्यामुळे आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो. याचा ज्यूस प्यायल्याने शरीराला थंडावा तर मिळतोच शिवाय पांढरे केसही पुन्हा काळे होऊ लागतात. म्हणूनच दररोज दुधीभोपळ्याचा रस प्या.

3. दुधी भोपळ्याची साल वापरा

जर फक्त दुधी भोपळ्याच्या सालीचा वापर केला तर ते तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरेल. यासाठी प्रथम दुधी भोपळ्याची साल वेगळी करा आणि नंतर पिळून त्याचा रस काढा. आता हे डोक्याला लावा आणि काही वेळ राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. तुमचे केस काळे तर होतीलच पण तुटण्यापासूनही वाचतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com