Bhogi Date 2026: यंदा भोगी किती तारखेला? पंचागानुसार मुहूर्त काय? वाचा संपूर्ण माहिती

Makar Sankranti 2026: हिंदू पंचांगानुसार भोगी सण 13 जानेवारी 2026 रोजी साजरा होणार आहे. भोगीचे धार्मिक महत्व, शुभ मुहूर्त, परंपरा आणि साजरीकरणाची संपूर्ण माहिती वाचा.
Bhogi Festival 2026
Bhogi Date and MuhuratGoogle
Published On

नवीन वर्षाला सुरुवात झाली की, अनेक सणांनाही सुरुवात होते. महाराष्ट्रात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे इथे सगळे बारिक-सारिक सण सुद्धा एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. त्यातच जानेवारी महिन्यातला पहिला आणि सगळ्यांच्या आवडीचा सण म्हणजे मकर संक्रात. या दिवशी सगळे लोक तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्या देतात. पण याआधी एक सण असतो. तो म्हणजे भोगी. यामध्ये अनेक पारंपारिक पद्धती असतात त्या फॉलो केल्या जातात. पुढे आपण याबद्दल जाणून घ्या.

भोगी सण यंदा किती तारखेला?

भोगी हा सण आला की संक्रात आली असं मानलं जातं. हिंदू पंचांग आणि 2026 च्या सणांच्या दिनदर्शिकेनुसार भोगी 2026 मंगळवार, 13 जानेवारी 2026 रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. अनेकांना भोगी 13 की 14 जानेवारीला याबाबतचा संभ्रम असतो, पण पंचांगानुसार भोगी 13 जानेवारीलाच येते, तर मकरसंक्रात ही 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाते.

Bhogi Festival 2026
Heart Blockage: जास्त धावपळीमुळे वाढेल हार्ट ब्लॉकेजचा धोका, डॉक्टरांनी सांगितली ही ४ लक्षणं, वाचून व्हाल चकीत

भोगी शुभ मुहूर्त काय?

हिंदू पंचांगानुसार 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजून 13 मिनिटांनी भोगी संक्रांत सुरु होणार आहे. त्यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे भोगी आणि मकरसंक्रात हे दोन्ही सण सलग दोन दिवस साजरे केले जातील. तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये भोगीला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. या दिवशी पहाटेपासूनच पूजा, विधी आणि परंपरांचे पालन केले जाते.

भोगीचे महत्व

भोगी हा चार दिवसांच्या संक्रांतीतला पहिला दिवस असतो. त्यानंतर मकरसंक्रात किंवा पोंगल, मट्टू पोंगल आणि कानूम पोंगल असे सण साजरे केले जातात. भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात, आरंभ, सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग असा आहे. या दिवशी लोक घरातील जुन्या, न वापरल्या जाणाऱ्या वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतात.

भोगी सण कसा साजरा केला जातो?

भोगीच्या पहाटे भोगी मंतालु म्हणजेच पवित्र होम किंवा शेकोटी पेटवली जाते. या अग्नीत जुन्या लाकडी वस्तू अर्पण केल्या जातात. हा विधी शुद्धीकरण आणि परिवर्तनाचे प्रतीक मानला जातो. काही ठिकाणी सकाळी फटाकेही फोडले जातात. लहान मुलांना पारंपरिक पोशाख घातला जातो. लहान मुलांना सजवून त्यांच्यावर हरभरे, ऊस, गूळ, नाणी आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो. या विधीमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहावे, दीर्घायुष्य लाभावे आणि वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे अशी भावना असते. तुम्ही सुद्धा यंदा भोगी मोठ्या उत्साहात साजरी करा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Bhogi Festival 2026
Aloo Methi Bhaji: थंडीत कांदा- बटाटा भजी खाऊन कंटाळलात? मग झटपट बनवा मेथीचे कुरकुरीत भजी, वाचा परफेक्ट रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com