Shardiya Navratri 2026 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी-नवमी कधी आहे? तिथीमुळे कन्फ्यूजन वाढलंय? जाणून घ्या शुभ मुहूर्त

Navratri Ashtami 2026: शारदीय नवरात्री २०२६ मध्ये अष्टमी आणि नवमी कधी आहे? माता महागौरी आणि सिद्धिदात्री पूजेचे महत्त्व, कन्या पूजनाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या. हवन आणि पूजेचे विधी आपल्या परंपरेनुसार कधी करावेत, याची माहिती वाचा.
Shardiya Navratri 2026
Shardiya Navratri 2026saam tv
Published On: 

शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी या दोन तिथींना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. या दिवशी देवी दुर्गेच्या आठव्या स्वरूपाची म्हणजेच माता महागौरीची आणि नवव्या स्वरूपाची म्हणजेच माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. या दोन्ही दिवशी देवीची मनोभावे पूजा केल्याने तिचा आशीर्वाद मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचे पठण आणि कन्या पूजन करण्याचीही परंपरा आहे.

नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीला अनेक घरांमध्ये देवीला हलवा, पुरी आणि काळ्या चण्यांचा नैवेद्य दाखवला जातो. यासोबतच लहान मुलींना देवीचं रूप मानून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना जेवण दिलं जातं. तुम्हालाही यंदा कन्या पूजन करायचं असेल तर अष्टमी आणि नवमीची तारीख, पूजेचा शुभ मुहूर्त आणि या दोन्ही दिवसांचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या.

Shardiya Navratri 2026
Krishna Janmashtami 2026: यंदाच्या जन्माष्टमीला द्वापार युगासारखा दुर्मिळ महासंयोग! ४ राशींचं उजळणार भाग्य

अष्टमी तिथी 2026 कधी आहे?

वैदिक पंचांगानुसार, आश्विन शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला 18 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 वाजून 27 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ही तिथी 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 51 मिनिटांनी संपेल. त्यामुळे उदयतिथीनुसार, म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी असलेल्या तिथीनुसार, अष्टमी 19 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. याच दिवशी भाविक कन्या पूजनही करू शकतात.

अष्टमीला कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त

अष्टमीच्या दिवशी म्हणजेच 19 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 वाजून 29 मिनिटांपासून ते सकाळी 10 वाजून 16 मिनिटांपर्यंत कन्या पूजन करता येणार आहे.

शारदीय नवरात्रीची नवमी तिथी 2026 मध्ये कधी?

द्रिक पंचांगानुसार, आश्विन शुक्ल पक्षातील नवमी तिथीला 19 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजून 51 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या तिथीची समाप्ती 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी होईल. अशा स्थितीत शास्त्रानुसार 19 ऑक्टोबर रोजी नवमी साजरी करणं योग्य मानलं जातं. मात्र, उदयतिथीनुसार नवमी साजरी करू इच्छिणारे भाविक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 50 मिनिटांपूर्वी कन्या पूजन आणि हवन करू शकतात.

नवमीला कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त

जर तुम्हाला 19 ऑक्टोबर 2026 रोजी नवमीचं कन्या पूजन करायचं असेल, तर अभिजित मुहूर्तात पूजा करू शकता. या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11 वाजून 43 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत असणार आहे.

Shardiya Navratri 2026
Surya Gochar 2026: नवरात्रीत 5 राशींच्या आयुष्यात मोठा ट्विस्ट! काम-धंद्यात अडचणी, प्रेमातही वाढणार तणाव

अष्टमी आणि नवमीचं धार्मिक महत्त्व

शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी या दोन्ही तिथींना धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थान आहे. अष्टमीला देवी दुर्गेच्या आठव्या रूपाची, म्हणजेच माता महागौरीची पूजा केली जाते. तर नवमीला देवीच्या नवव्या रूपाची, म्हणजेच माता सिद्धिदात्रीची आराधना केली जाते.

या दोन्ही दिवशी भाविक देवीची विशेष पूजा करतात. घरात सुख-समृद्धी नांदावी, कुटुंबात आनंद राहावा आणि सर्वांचं कल्याण व्हावं, अशी प्रार्थना देवीकडे केली जाते. नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन करण्याचीही जुनी परंपरा आहे. लहान मुलींमध्ये देवीचे रूप पाहून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना आदराने जेवण दिलं जातं. या पूजेमुळे माता दुर्गेचा आशीर्वाद मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

काही भाविक अष्टमीला कन्या पूजन आणि हवन करतात, तर काही जण नवमीच्या दिवशी हे धार्मिक विधी करतात. त्यामुळे आपल्या परंपरेनुसार आणि पंचांगातील तिथी व मुहूर्त लक्षात घेऊन भाविक कन्या पूजन करू शकतात.

Shardiya Navratri 2026
Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

टीप : वरील राशीभविष्य हे ज्योतिषशास्त्रावर आधारित सामान्य अंदाज आहेत. प्रत्यक्ष आयुष्यातील निर्णय घेताना स्वतःची परिस्थिती आणि योग्य माहिती यांचा विचार करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com