Wheat Flour Face Pack
Skincare Tips SAAM TV

Skincare Tips : चेहऱ्यावर हवंय नैसर्गिक तेज ? चमचाभर गव्हाचे पीठ करेल जादू, स्कीन प्रॉब्लेम्स होतील दूर

Wheat Flour Face Pack : रोजच्या जेवणातील गव्हाचे पीठ निस्तेज झालेली त्वचा ग्लोइंग करण्यास मदत करते. झटपट फेसपॅकची रेसिपी नोट करून घ्या आणि चेहऱ्याचे आरोग्य जपा.
Published on

पावसाळ्यात दमट हवामानामुळे त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण पावसाळ्यात मुरुम, सुरकुत्या, पिंपल्स आणि काळे डाग यांचे प्रमाण वाढते. ब्युटी पार्लरमध्ये जाणून जास्तीचे पैसे घालवण्यापेक्षा घरीच साध्या सोप्या पद्धतीने फेसपॅक तयार करा आणि चेहऱ्याचे आरोग्य उत्तम ठेवा. यासाठी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता. गव्हाच्या पिठातील पोषक घटक त्वचा मुलायम करण्यास मदत करते.

गव्हाच्या पिठाचा फेसपॅक

साहित्य

  • गव्हाचे पीठ

  • गुलाबपाणी

  • मध

  • एलोवेरा जेल

  • चंदन पावडर

  • मुलतानी माती

कृती

गव्हाच्या पिठाचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात गुलाबपाणी, मध , एलोवेरा जेल, चंदन पावडर, मुलतानी माती घालून छान पेस्ट करून घ्या. ही पेस्ट थोडी घट्टसर करून घ्या. आता हा तयार झालेला गव्हाच्या पिठाचा फेसपॅक चेहऱ्याला लावा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावताना सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी त्वचेला एलोवेरा जेल लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. त्यानंतर हा फेसपॅक चेहऱ्यावर लावून १५ ते २० मिनिटे ठेवा. फेसपॅक सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. त्यांनतर यावर बर्फ चोळा आणि मऊ कपड्यांने चेहरा स्वच्छ करा. हा फेसपॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा लावा. यामुळे पावसाळ्यात त्वचा निरोगी राहील.

Wheat Flour Face Pack
Skin Care Tips : फुलांमध्ये दडलयं ब्युटी सीक्रेट, घरबसल्या चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक!

चेहऱ्याच्या कोणत्या समस्या दूर होतील?

  • चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल.

  • चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील.

  • डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करायची असल्यास हा फेसपॅक लावा.

  • मुरुम

  • टॅनिंग

  • सुरकुत्या

  • पिंपल्स

  • निस्तेज चेहरा उजळ होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Wheat Flour Face Pack
Beauty Skin : महागड्या कॉस्मेटिक्सला करा बाय बाय; फक्त २० रुपयांची ही गोष्ट चेहऱ्याचं तेज वाढवेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com