Beauty Skin : महागड्या कॉस्मेटिक्सला करा बाय बाय; फक्त २० रुपयांची ही गोष्ट चेहऱ्याचं तेज वाढवेल

Applying Multani Mitti on Face : स्किन ग्लो करावी म्हणून काही महिला स्किन थेरेपीपासून फेशिअल आणि ब्लिच करत असतात. मात्र काही वेळा हे सर्व करून देखील हवा तसा ग्लो मिळत नाही.
Applying Multani Mitti on Face
Beauty SkinSaam TV
Published On

विविध प्रकारचे महागडे प्रोडक्ट वापरले, मात्र अजूनही चेहऱ्यावर हवा तसा ग्लो आलेला नाही. आता तुमच्याबरोबर देखील असंच काहीसं घडलं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे. बऱ्याच तरुणी आपल्या आयुष्यातील विविध इवेंटसाठी काही दिवस आधीपासून तयारीला लागतात. स्किन थेरेपीपासून फेशिअल आणि ब्लिच करत असतात. मात्र काही वेळा हे सर्व करून देखील हवा तसा ग्लो मिळत नाही. त्यामुळे आज नॅचर ग्लोसाठी आम्ही खास तुमच्यासाठी काही टिप्स आणल्या आहेत.

Applying Multani Mitti on Face
Summer Skin Care: उन्हाळ्यात होणाऱ्या टॅनिंगसाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय

महागड्या प्रोडक्टवर पैसे खर्च करून हवा तसा रिजल्ट मिळाला नाही की मन दुखावतं. त्यामुळे आता अवघे २० रुपये खर्च करून तुम्हाला नॅचरल ग्लो कसा मिळेल याची माहिती सांगणार आहोत. किंमत अगदी स्वस्त आणि या वस्तू सहज बाजारात मिळतील अशा आहेत. स्वस्तात मस्त प्रोडक्ट असले तरी याचे कोणतेही साईट इफेक्ट तुमच्या स्किनवर होणार नाहीत.

मुलतानी माती

ज्या व्यक्तींची त्वचा फार तेलकट आणि ऑइली असते त्यांना मुलतानी मातीमुळे बराच फायदा होतो. मुलतानी माती बाजारात फक्त २० ते २५ रुपयांना सहज मिळते. ही माती घरी आणल्यावर यात थोडं पाणी किंवा दूध मिक्स करा. तसेच स्किनवर ग्लो येण्यासाठी यामध्ये तुम्ही मध सुद्धा मिक्स करू शकता. मध मिक्स केल्यानंतर याची पातळ आणि थिक अशी पेस्ट बनवा. तयार पेस्ट चेहऱ्यावर सर्वत्र अप्लाय करा.

चेहऱ्यावर मुलतानी माती अप्लाय केल्यानंतर ती पूर्ण सुकू द्या. फेस ड्राय झाल्यानंतर चेहऱ्यावरील माती काढून घ्या. माती काढत असताना ती कोरडी आहे तेव्हाच काढू नका. कारण मातीमुळे स्किन जास्त प्रमाणात ड्राय झालेली असते. त्यामुळे चेहऱ्यावर आधी एक पाण्याचा हपका मारा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने तुमची डेड स्किन गायब होईल आणि चेहऱ्यावर सुंदर ग्लो येईल.

मुलतानी मातीचे काम

मुलतानी माती चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर तुमची स्किन अगदी खोलवर साफ केली जाते. त्यामुळे डेड स्किन पूर्णता निघते. चेहऱ्यावर असलेले काळे डाग सुद्धा दूर होतात. त्यासह मुलतानी माती चेहऱ्यावर अप्लाय केल्याने ओपन फोर्सचं प्रमाण कमी होतं. तसेच फेस टॅनींग निघून जाते.

Applying Multani Mitti on Face
Skin Care Tips: ग्लोइंग त्वचा हवी आहे? मात्र 'या' लोकांनी चुकूनही मुलतानी माती चेहऱ्यावर लावू नये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com