ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मार्च महिना सुरु होताच हवेतील तापमान वाढ होते. सूर्याची किरणं त्वचेच्या संपर्कात येताच चेहरा टॅन होतो.
सूर्याच्या किरणांमुळे त्वचेची जळजळ होणं या समस्या उद्भवतात.चेहऱ्यावरील टॅन घालवण्यासाठी घरगुती सोपे उपाय करा.
टोमॅटो, मुलतानी माती आणि चंदन पावडर एकत्र मिक्स करून चेहऱ्यावर स्क्रब केल्याने धुळीमुळे खराब झालेला चेहरा साफ होतो.
मध, लिंबाचा रस आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्यामुळे चेहरा चमकदार होते.
त्वचा जळजळणे हा त्रास उन्हाळ्यात होत असेल तर कोरफडीचा गर आणि गुलाबपाण्याने चेहऱ्यावर लावल्यास आराम मिळतो.
बाजारात मिळणाऱ्या स्क्रबपेक्षा तांदळाचं पीठ आणि नारळाचं तेल मिक्स करून चेहऱ्याला स्क्रब केल्यामुळे चेहऱ्यावरील टॅन कमी होतो
कॉफीमधील अँटी-सेल्युलाईट गुणधर्म डोळ्याखालचे डार्क सर्कल कमी करण्यास, चेहऱ्वरील टॅन काढण्यास मदत करतो
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़