कामाची बातमी! आता WhatsAppचाही सबस्क्रिशन प्लान घ्यावा लागणार; नवं फीचर लाँच होणार, वाचा सविस्तर माहिती

WhatsApp New Subscription Plan Feature: व्हॉट्सअ‍ॅप लवकरच युजर्ससाठी नवीन फीचर लाँच करणार आहे. सब्स्क्रिप्शन प्लान सुरु करणार आहे. यामध्ये अनेक फीचर्स मिळणार आहेत.
WhatsApp
WhatsAppsaam tv
Published On
Summary

व्हॉट्सअ‍ॅप लवकरच नवीन फीचर लाँच करणार

युजर्ससाठी सब्स्क्रिप्शन प्लान

युजर्संना मिळणार अनेक सुविधा

जगातील कोट्यवधी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात.व्हॉट्सअॅपद्वारे सर्व जग कनेक्ट झाले आहे. अवघ्या काही सेकंदात तुम्ही जगातील कोणत्याही कोपऱ्यात मेसेज पाठवू शकतात. व्हॉट्सअॅपमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. आता व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅप सबस्क्रिप्शन प्लान आणण्याचे तयारीत आहे.

WhatsApp
WhatsApp Update: QR कोड आणि 6 डिजिट PIN; आता मुलांच्या WhatsAppवर राहील पालकांची नजर; मेटानं आणलं नवं फीचर

मिडिया रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप सबस्क्रिप्शन प्लान फीचर रोलआउट केले जाऊ शकते. या नवीन प्लानला WhatsApp Plus नाव दिले जाते. यामध्ये अनेक नवीन बदल पाहायला मिळतील. यामध्ये युजर्स आपल्या मर्जीनुसार कस्टमायझेशनसोबत नवीन चॅट मॅनेजमेंट टूल वापरु शकतात. अँड्रॉइड आणि आयओएस अशा दोन्ही फोनमध्ये ही फीचर रोलआउट केले जाऊ शकते. हा प्लान घ्यायचा की नाही हे संपूर्णपणे युजर्सच्या हातात असणार आहे.

रिपोर्टनुसार, सबस्क्रिप्शन प्लानमध्ये जास्त फीचर्स मिळतील. मात्र, अॅपमधील फंक्शन म्हणजे मेसेजिंग, ऑडिओ, व्हिडिओ कॉल किंवा मिडिया शेअरिंग हे फ्री असणार आहे. कंपनीने या प्लानबाबत अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

WhatsApp
WhatsApp Update: यंदाच्या होळीला उधळा 'व्हॉट्सअ‍ॅप रंग'; Photo Sticker ते व्हॉईस चॅटपर्यंत धम्माल फीचर होणार अपडेट

काय सुविधा मिळणार?

जास्त फीचर्स मिळणार व्हॉट्सअॅपच्या नवीन सब्स्क्रिप्शन प्लानमध्ये एक्सट्रा चॅ पिनचा ऑप्शन मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही २० चॅट्स पिन करु शकतात.सध्या तुम्ही ३ चॅट्स पिन करु शकतात. याचसोबत १४ अॅप आयकॉन, टॅब, कलर बटण, फील्टर असे अनेक फीचर्स मिळतील.

WhatsApp
WhatsApp Ban: मोठी बातमी! तब्बल ८२ लाख भारतीयांचे व्हॉट्सअ‍ॅप बंद; कारणही आले समोर | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com