Best time to eat food: सकाळी काय खावं आणि रात्री काय टाळावं? या पदार्थांची योग्य वेळ जाणून घ्या, आरोग्याला होईल फायदा

Right time to eat food: फळं, भात, प्रोटीन, काजू-बदाम, दही आणि तिखट-तेलकट पदार्थ कोणत्या वेळी खावेत? रक्तातील साखर, पचनक्रिया आणि शरीराच्या नैसर्गिक चक्रानुसार आहाराची वेळ महत्त्वाची ठरू शकते. कोणता पदार्थ सकाळी, दुपारी किंवा रात्री खाणं योग्य, जाणून घ्या.
Best time to eat food
Best time to eat foodsaam tv
Published On

आपण दिवसभरात काय खातो, यासोबतच ते कोणत्या वेळी खातो, हेही महत्त्वाचं आहे. रक्तातील साखरेची पातळी, अन्न पचण्याचा वेग आणि शरीरातील हार्मोन्सची चक्रे यामुळे वेगवेगळ्या पदार्थांचा शरीरावर होणारा परिणाम वेळेनुसार बदलू शकतो. त्यामुळे काही पदार्थ सकाळी किंवा दुपारी खाणं चांगले ठरतं तर काही पदार्थ रात्री उशिरा खाल्ल्याने त्रास होऊ शकतो.

फळं सकाळी किंवा दुपारी खा

फळं लवकर पचतात आणि शरीराला पटकन ऊर्जा देतात. त्यामुळे सकाळी किंवा दुपारच्या सुरुवातीला फळं खाणं योग्य ठरू शकतं. रात्री फळे खाल्ल्याने काही लोकांना झोपेचा त्रास होऊ शकतो. फ्रुक्टोजचे शोषण वेगाने झाल्याने काही जणांना अॅसिडिटीही होऊ शकते.

Best time to eat food
High blood pressure: मधुमेह आणि हायपरटेन्शन बनतंय साइलेंट किलर, या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

भात, ब्रेड आणि पास्ता दुपारी

भात, ब्रेड आणि पास्तासारखे कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ दुपारच्या जेवणात घेणं योग्य ठरतं. रात्री उशिरा हे पदार्थ खाल्ल्यास पोट जड वाटू शकतं आणि अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या रूपात साठण्याची शक्यता असते.

नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील चीफ डायटिशियन प्रतिक्षा कदम यांनी संगितलं की, “रक्तातील साखर, पचनाची गती आणि शरीरातील हार्मोन्स यामुळे एखादा पदार्थ कोणत्या वेळी खाल्ला जातो, याचा त्याच्या परिणामावर प्रभाव पडतो. त्यामुळे आहार घेताना पदार्थासोबतच त्याची वेळही लक्षात घेणे गरजेचे आहे.”

प्रोटीन दिवसभर घ्या

मांस, अंडी आणि पनीर यांसारखे प्रोटीनयुक्त पदार्थ दिवसभरात कोणत्याही वेळी खाता येतात. दुपारच्या जेवणात प्रोटीन घेतल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखं राहण्यास आणि रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते. स्नायूंच्या रिकव्हरीसाठी रात्री प्रोटीन घेणंही उपयोगी ठरू शकतं. मात्र झोपण्यापूर्वी खूप जास्त प्रोटीन घेतल्यास काहींना पोटात अस्वस्थता जाणवू शकते.

Best time to eat food
Diabetes: टाईप 1 आणि टाईप 2 डायबेटीज यांच्यात काय आहे फरक? कोणता प्रकार जास्त धोकादायक?

काजू-बदाम आणि बिया सकाळी

नट्स आणि सीड्स म्हणजे काजू, बदाम आणि विविध बिया सकाळी खाल्ल्यास दिवसभरासाठी ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते. यामुळे मधल्या वेळच्या अनावश्यक खाण्याची इच्छा कमी होण्यासही मदत होते. मात्र हे पदार्थ चरबीयुक्त असल्याने रात्री उशिरा खाल्ल्यास पोटाला जड वाटू शकतं.

दही किंवा योगर्ट

दही आणि योगर्ट दिवसा खाल्ल्याने पचन आणि आतड्यांच्या आरोग्यास मदत होऊ शकते. मात्र रात्री दही किंवा योगर्ट घेतल्यास काही लोकांना पोट फुगणं किंवा कफ वाढल्यासारखे वाटू शकतं.

तिखट-तेलकट पदार्थ दुपारीच

तिखट आणि तेलकट पदार्थ शक्यतो दुपारच्या जेवणात घेणं योग्य ठरू शकतं. दिवसा शरीर जड पदार्थ हाताळण्यास अधिक सक्षम असते. रात्री असं पदार्थ खाल्ल्यास अॅसिडिटी होण्यासोबत झोपही बिघडू शकते.

Best time to eat food
Thigh length and diabetes: मांडीची लांबी सांगणार टाईप-२ मधुमेहाचा धोका? नव्या अभ्यासातून धक्कादायक संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com