Cardiac arrest: ऑफिस, जिम किंवा घरात कुणाला हार्ट अटॅक आला तर काय कराल? जीव वाचवण्यासाठी तातडीने करा 'ही' मदत

Cardiac arrest symptoms: कार्डियाक अरेस्ट आल्यास नेमकं काय करावं? सीपीआर कसा द्यावा आणि एईडी मशीनचा वापर कसा करावा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कार्डियाक अरेस्टची लक्षणं, आपत्कालीन मदतीचे उपाय आणि जीव वाचवण्यासाठी महत्त्वाच्या प्राथमिक उपचारांची माहिती.
Cardiac arrest
Cardiac arrestsaam tv
Published On: 

आजच्या धावपळीच्या जीवनात हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतोय. हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्ट कोणालाही आणि कुठेही येऊ शकतो. यासाठी व्यक्तीचं वय किंवा फिटनेसही कारणीभूत ठरेलच असं नाही. अशा वेळी वेळेत मदत मिळणं महत्त्वाचं असतं. एखाद्या व्यक्तीला अचानक कार्डियाक अरेस्ट आला तर नेमकं काय करावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. ऑफिस, जिम किंवा घरात अशी घटना घडल्यास काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील अपघात आणि आपत्कालीन विभागाचे संचालक तसंच अंतर्गत औषधोपचार विभागाचे सल्लागार डॉ. संजय मेहता यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

कार्डियाक अरेस्टची लक्षणं ओळखा

एखादी व्यक्ती अचानक खाली पडली, तिला शुद्ध राहिली नाही आणि तिचा श्वास सामान्यपणे सुरू नसेल तर कार्डियाक अरेस्टचा संशय घ्यावा. व्यक्ती फक्त चक्कर येऊन पडली असेल थकली असेल किंवा शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे असं झालं असेल असं समजून दुर्लक्ष करू नका.

Cardiac arrest
Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर घरच्या घरी कसा चेक कराल? जाणून घ्या ७-२-२ चा नियम

तातडीने मदत मागा

अशा वेळी भारतातील 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करा. एका व्यक्तीला अॅम्ब्युलन्स बोलवायला सांगा तर दुसऱ्या व्यक्तीला जवळपास AED मशीन आणण्यास सांगा.

सीपीआर देण्यास सुरुवात करा

व्यक्तीला पाठीवर, सपाट आणि कठीण जागेवर झोपवा. त्यानंतर छातीच्या मधोमध दोन्ही हात ठेवून दाब देण्यास सुरुवात करा. प्रौढ व्यक्तीच्या छातीवर 5 ते 6 सेंटीमीटर दाब द्यावा. एका मिनिटात 100 ते 120 वेळा दाब देणं आवश्यक आहे. प्रत्येक दाबानंतर छाती पुन्हा पूर्ववत होऊ द्या. शक्यतो सीपीआर देताना मध्ये खंड पडू देऊ नका.

ऑफिस, जिम आणि घरात काय कराल?

ऑफिसमध्ये अशी घटना घडल्यास सुरक्षा कर्मचारी किंवा प्रथमोपचाराचं प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना बोलवा. अॅम्ब्युलन्सला योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्ग दाखवण्याची व्यवस्था करा आणि जवळचे AED मशीन आणा.

Cardiac arrest
Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर नेमका कधी चेक करावा? दिवसभरातील 'हा' टाइम सर्वात बेस्ट

जिममध्ये व्यायाम करताना एखादी व्यक्ती अचानक कोसळल्यास व्यायाम थांबवा. मदत बोलवा आणि व्यक्ती स्वतःहून बरी होते का, याची वाट न पाहता सीपीआर सुरू करा. घरी कुटुंबातील सर्वांना सीपीआरचं प्रशिक्षण असणे फायदेशीर ठरतं. आपत्कालीन क्रमांक सहज दिसतील अशा ठिकाणी ठेवा. जवळ AED मशीन उपलब्ध असल्यास कोणाला तरी ते आणायला सांगा.

AED मशीनचा वापर कसा कराल?

AED मशीन सुरू करा. त्यासोबत दिलेल्या सूचनेनुसार छातीवर पॅड लावा आणि मशीनच्या आवाजातील सूचनांचे पालन करा. मशीन हृदयाची तपासणी करत असताना किंवा विद्युत झटका देताना व्यक्तीला कोणीही स्पर्श करू नये.

प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी येईपर्यंत, व्यक्तीला पुन्हा शुद्ध येऊन सामान्य श्वास सुरू होईपर्यंत किंवा मदत करणाऱ्याला शारीरिकदृष्ट्या पुढे मदत करणे शक्य होईपर्यंत सीपीआर सुरू ठेवा.

Cardiac arrest
Blood pressure: बीपीचं रिडिंग सतत चुकीचं येतंय? तुम्ही चुकीच्या वेळी तर तपासत नाही ना? वाचा रक्तदाब तपासण्याची योग्य वेळ

वेळीच केलेली मदत वाचवू शकते जीव!

कार्डियाक अरेस्ट कोणत्याही वयाच्या आणि कितीही फिट असलेल्या व्यक्तीला येऊ शकतो. त्यामुळे सीपीआरचे प्राथमिक प्रशिक्षण घेणे, AED मशीनची उपलब्धता असणं आणि प्रसंग ओळखून तातडीने मदत करणं एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.