Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर घरच्या घरी कसा चेक कराल? जाणून घ्या ७-२-२ चा नियम

Surabhi Jayashree Jagdish

बीपी तपासण्यासाठी ७-२-२ नियम

हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित शस्त्रक्रिया करणारे डॉ. जेरेमी लंडन यांनी बीपी तपासण्यासाठी ७-२-२ हा नियम सांगितला आहे. या नियमानुसार सलग सात दिवस सकाळी आणि संध्याकाळी बीपी तपासावा. प्रत्येक वेळी दोन रीडिंग घ्याव्यात आणि सर्व रीडिंगची सरासरी काढावी.

Blood pressure monitoring | saam tv

एकदाच बीपी तपासणं

एकदा बीपी तपासल्याने त्या वेळचा रक्तदाब समजतो पण तो नेहमीचा रक्तदाब असेलच असं नाही. ताण, दवाखान्यात पोहोचण्याची घाई, चहा-कॉफी पिणं किंवा रात्री पुरेशी झोप न होणं यामुळे रीडिंगमध्ये बदल होऊ शकतो.

High blood pressure | saam tv

७-२-२ नियमामुळे काय समजतं?

या पद्धतीत सात दिवस सकाळी आणि संध्याकाळी बीपी तपासला जातो. प्रत्येक वेळी दोन रीडिंग घेतल्यामुळे रक्तदाबातील चढ-उतार समजण्यास मदत होते. तसंच दवाखान्यात बीपी जास्त येतो पण घरी सामान्य असतो का, हेही लक्षात येऊ शकते.

BP monitoring tips | saam tv

घरी बीपी तपासण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?

बीपी तपासण्याच्या आधी सुमारे ३० मिनिटं व्यायाम करणं, धूम्रपान करणे आणि चहा-कॉफीसारखी कॅफिन असलेली पेये पिणं टाळावं. बीपी मोजण्यापूर्वी लघवी करून घ्यावी आणि किमान पाच मिनिटं शांत बसावे. यामुळे रक्तदाबाचे रीडिंग अधिक योग्य मिळण्यास मदत होते.

Accurate BP readings | saam tv

बीपी दोन वेळा मोजणं

दिवसभरात रक्तदाबात नैसर्गिकरीत्या चढ-उतार होत असतात, त्यामुळे एकच जास्त किंवा कमी रीडिंग नेहमीचा रक्तदाब दाखवत नाही. फोन, अपुरी झोप, वेदना किंवा घाई यामुळे बीपी तात्पुरता वाढू शकतो.

Blood pressure measurement | saam tv

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

बीपीची रीडिंग जास्त येत असल्यास केवळ एका आकड्यांवरून ठरवू नयेत. वय, हार्ट अटॅकचा धोका, मधुमेह, किडनीचं आरोग्य आणि अनेक दिवसांच्या बीपी रीडिंगचा विचार करून डॉक्टर उपचार ठरवतात.

Blood pressure average | saam tv

बीपी १८०/१२० किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास काय करावं?

बीपीचं रीडिंग १८०/१२० mmHg किंवा त्यापेक्षा जास्त आल्यास काही मिनिटांनी पुन्हा बीपी तपासावा. दुसऱ्यांदा तपासल्यावरही बीपी इतका जास्त असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा, गोंधळल्यासारखे वाटणं किंवा दृष्टीत बदल अशी लक्षणं असल्यास पुन्हा रीडिंग घेण्यासाठी थांबू नका.

Blood pressure measurement precautions | saam tv

Tyre expiry date: वाहनांच्या टायरची एक्सपायरी डेट काय असते? जाणून घ्या

Tyre expiry date | saam tv
येथे क्लिक करा