Pitru Paksha 2026: श्राद्धाच्या दिवशी जेवणात काय बनवावे आणि काय बनवू नये? वाचा संपूर्ण यादी

Pitru Paksha dates 2026: पितृपक्ष 2026 मध्ये श्राद्धाच्या भोजनात कोणते पदार्थ शुभ मानले जातात आणि कोणते पदार्थ टाळण्याची धार्मिक परंपरा आहे, जाणून घ्या. श्राद्धाचे भोजन तयार करताना स्वच्छता, शुद्धता आणि ताजेपणाबाबत कोणती काळजी घ्यावी, हेही जाणून घ्या.
Pitru Paksha 2026
Pitru Paksha 2026saam tv
Published On: 

पितरांचं स्मरण आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. यंदा पितृपक्षाची सुरुवात 26 सप्टेंबरपासून होतोय. 26 सप्टेंबरला पौर्णिमेचे श्राद्ध केलं जाईल तर 27 सप्टेंबरपासून प्रतिपदेचं श्राद्ध सुरू होणार आहे. 10 ऑक्टोबरला सर्वपितृ अमावस्येला पितृपक्षाची सांगता होणार आहे.

यंदा श्राद्धाच्या तिथींमध्ये काही ठिकाणी घट आणि वाढ होत आहे. त्यामुळे चतुर्थी आणि पंचमी या दोन्ही तिथींचे श्राद्ध एकाच दिवशी म्हणजे 30 सप्टेंबरला केलं जाणार आहे.

Pitru Paksha 2026
Krishna Janmashtami 2026: कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

पितरांचं श्राद्ध का करावं?

पितरांचं श्राद्ध करणं हे सनातन धर्मातील महत्त्वाचं कर्म मानलं जातं. आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केलं जातं. अशी धार्मिक मान्यता आहे की, जे लोक आपल्या पितरांचं श्राद्ध करतात त्यांना पितरांचा आशीर्वाद मिळतो. ज्या पितरांना त्यांच्या वंशजांकडून जल किंवा इतर विधी मिळत नाहीत ते नाराज होऊन शाप देऊन जातात अशीही धार्मिक मान्यता आहे.

त्यामुळे प्रत्येक सनातनी व्यक्तीने आपल्या पितरांच्या मृत्यूच्या तिथीला शक्य तितक्या साध्या पद्धतीने श्राद्ध करावं, असं सांगितलं जातं. यासाठी जल, तिळ, कुश आणि फुलं यांचा वापर करता येतो. त्याचप्रमाणे गायीला गवत द्यावं आणि एक, तीन किंवा पाच ब्राह्मणांना भोजन देण्याची परंपरा आहे.

श्राद्धाच्या जेवणात काय असावं?

श्राद्धाच्या भोजनाबाबत पुराणांमध्येही काही नियम सांगण्यात आलेत. विष्णू पुराणानुसार श्राद्धाच्या भोजनात काही पदार्थ असणं शुभ मानलं जातं. जव, कांगणी, मूग, गहू, धान, तीळ, मटार आणि मोहरी यांचा श्राद्धाच्या भोजनात समावेश करणं चांगलं मानलं जातं. श्राद्धाच्या दिवशी भोजन बनवताना घरातील स्वच्छता आणि पवित्रतेची विशेष काळजी घ्यावी. श्राद्धासाठी बनवलेलं अन्न स्वच्छ आणि ताजं असावं.

श्राद्धाच्या दिवशी कोणते पदार्थ टाळावेत?

धार्मिक ग्रंथांमध्ये श्राद्धाच्या दिवशी काही पदार्थ टाळण्यास सांगितले आहे. मोठे उडीद, छोटे उडीद, मसूर, भोपळा, गाजर, कांदा हे पदार्थ श्राद्धाच्या जेवणात बनवू नयेत, असं सांगितलं जातं. याशिवाय तूस निघालेल्या धान्याचे पीठ, क्षारयुक्त किंवा ऊसर जमिनीत तयार झालेले मीठ, हिंग आणि लाल रंगाच्या वस्तूंचाही श्राद्धाच्या भोजनात वापर करू नये, असं धार्मिक ग्रंथांमध्ये नमूद आहे. या वस्तू श्राद्धकर्मात वर्ज्य मानल्या जातात.

Pitru Paksha 2026
Pitru Paksha 2026: श्राद्धाच्या दिवशी कावळा दिसला नाही किंवा अन्नाला शिवला नाही? धार्मिक मान्यतेनुसार करा हा सोपा उपाय

फेस असलेलं पाणीही श्राद्धासाठी योग्य मानलं जात नाही

श्राद्धकर्मासाठी काही प्राण्यांचं दूध वापरू नये, असंही सांगितलं आहे. मेंढीचे दूध, हरिणीचं दूध आणि म्हशीचं दूध श्राद्धाच्या विधीत वापरू नये. त्यामुळे श्राद्धाच्या भोजनासाठी दूध आवश्यक असल्यास गायीचं दूध वापरता येतं.

श्राद्धाचं जेवण बनवताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

घरात श्राद्धाचं जेवण बनवत असाल तर स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व द्यावं. स्वयंपाकाची जागा स्वच्छ असावी. तसंच धार्मिक परंपरेनुसार, महिलांनी शुद्ध अवस्थेत आणि स्वच्छ जागी श्राद्धाचे भोजन तयार करावं. श्राद्धासाठी असं अन्न देऊ नये ज्यामध्ये नखं, केस किंवा किडे असतील. श्राद्धाच्या दिवशी अन्न तयार करताना स्वच्छता, शुद्धता आणि ताजेपणाची विशेष काळजी घेणं आवश्यक मानलं जातं.

Pitru Paksha 2026
Pitru Paksha: श्राद्धाचे जेवण कोणाला द्यावं आणि कोणाला देऊ नये? जाणून घ्या धार्मिक परंपरेतील नियम

डिस्क्लेमर

या बातमीमध्ये हिंदू धार्मिक परंपरेत आढळणारी माहिती देण्यात आली आहे. यातील उल्लेख हे धार्मिक ग्रंथ व श्रद्धांवर आधारित असून, त्यांना वैज्ञानिक तथ्य किंवा सिद्ध झालेले सत्य म्हणून घेऊ नये.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com