Bhau Beej 2025: भावाला ओवाळण्यासाठी उद्या कोणता मुहूर्त सर्वोत्तम? आत्ताच नोट करून ठेवा वेळ

Bhai Dooj 2025 Shubh Muhurat: दिवाळीचा शेवटचा आणि भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजेच भाऊबीज उद्या गुरुवारी २३ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. भाऊबीजेला यम द्वितीया असंही म्हणतात
Bhai Dooj 2025
Bhai Dooj 2025saam tv
Published On

हिंदू धर्मात भाऊबीज हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला हा सण साजरा केला जातो. याला भ्रातृ द्वितीया असंही म्हटलं जातं. भाऊबीज हा सण भावंडांमधील प्रेम, विश्वास आणि आपुलकं प्रतीक असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला तिलक करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात.

या सणाला भाऊ देखील बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. यंदा भाऊबीज गुरुवार २३ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे. ही तिथी यम द्वितीया म्हणूनही ओळखली जाते.

Bhai Dooj 2025
Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजन केल्यानंतर रात्री घराचे दरवाजे उघडे का ठेवतात? जाणून घ्या खरं कारण

भाऊबीज २०२५ चे शुभ मुहूर्त

पंचांगानुसार भाऊबीज कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीला साजरी होते. यंदा ही तिथी बुधवार २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून १६ मिनिटांनी सुरू होणार आहे. गुरुवार २३ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून ४६ मिनिटांनी संपणार आहे.

भावाला ओवाळण्याच्या शुभ वेळा

पहिला मुहूर्त दुपारी १ वाजून १३ मिनिटांपासून ते ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर दुसरा अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांपासून ते १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत असेल तिसरा विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपासून ते २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत असेल चौथा गोधूळी मुहूर्त संध्याकाळी ५ वाजून ४३ मिनिटांपासून ते ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत असणार आहे.

Bhai Dooj 2025
Lakshmi Puja Thali: देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आरतीच्या ताटात या वस्तू जरूर ठेवा

भाऊबीज २०२५ चे शुभ योग

या वर्षी भाऊबीजचा सण सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योगात साजरा होणार आहे. हे योग अतिशय शुभ मानले जातात.

Bhai Dooj 2025
Diwali 2025: आजच्या दिवशी लक्ष्मीपुजन करणार असाल तर मुहूर्त जाणून घ्या; वाचा शहरानुसार किती वाजता करावी पुजा?

पूजन विधी

भाऊबीजच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. पूजेसाठी गणपती आणि चित्रगुप्त यांची पूजा करावी. त्यानंतर बहिणी भावाला ओवाळतात. भाऊही बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. या दिवशी भावंडांमधील प्रेम आणि आशीर्वादाला विशेष महत्त्व असतं.

Bhai Dooj 2025
Diwali Padwa: दिवाळीचा आजचा दिवस सोन्यासारखा! पाडव्याच्या मुहूर्तावर या राशींना मिळणार भाग्याची साथ

भाऊबीजेचं महत्त्व

या दिवशी भगवान चित्रगुप्ताची पूजा करण्याचा शास्त्रानुसार विधी आहे. भाऊबीज हा सण भावंडांच्या नात्याला अधिक घट्ट करतो. बहिणी या दिवशी भावाला ओवाळण्यापूर्वी काहीही खात नाहीत. या व्रताला भ्रातृ द्विज व्रत असं म्हणतात. पूर्ण तिथी उपवास करणं आवश्यक नसलं तरी ओवाळणी होईपर्यंत उपवास पाळणं शुभ मानलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com