Diwali 2025: आजच्या दिवशी लक्ष्मीपुजन करणार असाल तर मुहूर्त जाणून घ्या; वाचा शहरानुसार किती वाजता करावी पुजा?

Diwali 2025 Laxmi Puja Muhurat According to city: प्रकाशाचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा दिवाळी सण म्हणजे धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मी हिची विशेष पूजा करण्याचा दिवस. लक्ष्मी पूजन नेहमी प्रदोष काळात करणं अत्यंत शुभ मानले जाते.
Diwali 2025 Laxmi Puja Muhurat According to city
Diwali 2025 Laxmi Puja Muhurat According to citysaam tv
Published On

जरी दिवाळीचं मुख्य पर्व २० ऑक्टोबरला मोठ्या उत्साहात साजरा केलं गेलं. तरी पंचांगानुसार, काही घरांमध्ये लक्ष्मी पूजन २० ऑक्टोबरला झालं तर काही ठिकाणी २१ ऑक्टोबर २०२५ म्हणजे आजच्या दिवशी माता लक्ष्मीची आराधना केली जाणार आहे. २१ ऑक्टोबर रोजी काही जणं शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मी आणि गणेशजीची पूजा करतील आणि त्यानंतर घरात दिवेही लावले जातील.

प्रदोष कालात माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे, तर निशिता कालातही दिवाळी पूजा करण्याचा विधान आहे. जर तुम्ही आजच्या दिवशी लक्ष्मीपुजन करणार असाल तर मुहूर्त माहिती असणं गरजेचं आहे. या वर्षी २१ ऑक्टोबरसाठी दिवाळी पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहेत ते पाहूयात.

Diwali 2025 Laxmi Puja Muhurat According to city
Lakshmi Pujan Marathi Wishes: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रियजनांना पाठवा दिवाळीच्या खास शुभेच्छा

दिवाळी २१ ऑक्टोबर २०२५ लक्ष्मी पूजन मुहूर्त

  • अमावस्या तिथी २० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ०३:४४ वाजता सुरू होणार आहे.

  • अमावस्या तिथीचा समारोप २१ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी ०५:५४ वाजता होईल.

  • लक्ष्मी पूजन मुहूर्त- संध्याकाळी ०५:५० ते ०५:५६ वाजता

  • लक्ष्मी पूजन निशिता काल मुहूर्त- रात्री ११:३६ ते मध्यरात्री १२:२५

  • प्रदोष काल- संध्याकाळी ०५:५० ते ०८:१८

  • सिंह काल- रात्री ०१:४० ते ०३:५२

Diwali 2025 Laxmi Puja Muhurat According to city
Lakshmi Puja 2025: लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवण्याचे ८ सोपे पर्याय; खायची पानं, फुलं आणि दिव्यांनी सजवा कलश

आजच्या दिवशी शहरानुसार लक्ष्मी पूजन मुहूर्त

  • पुणे: संध्याकाळी ०५:५० ते ०५:५६

  • नवी दिल्ली: संध्याकाळी ०५:५० ते ०५:५६

  • नोएडा: संध्याकाळी ०५:५० ते ०५:५६

  • लखनऊ: संध्याकाळी ०५:५० ते ०५:५६

  • चेन्नई: संध्याकाळी ०५:५० ते ०५:५६

  • हैदराबाद: संध्याकाळी ०५:५० ते ०५:५६

  • मुंबई: संध्याकाळी ०५:५० ते ०५:५६

  • बंगळुरू: संध्याकाळी ०५:५० ते ०५:५६

  • अहमदाबाद: संध्याकाळी ०५:५० ते ०५:५६

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com