World Breastfeeding Week: पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचं दूध दिलं तर शरीरात नेमकं काय घडतं? तज्ज्ञांनी सांगितले फायदे

Newborn baby: जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त तज्ज्ञांनी पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचे दूध देण्याचा सल्ला दिला आहे. आईचे दूध रोगप्रतिकारशक्ती वाढवते, मेंदूच्या विकासाला चालना देते आणि आई-बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी अनेक फायदे देते.
World Breastfeeding Week
World Breastfeeding Weeksaam tv
Published On

नवजात बाळाच्या निरोगी आयुष्याची सुरुवात आईच्या दुधापासूनच होते. पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचं दूध दिल्यास त्याला आवश्यक पोषण मिळतं, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि पुढील आयुष्यात अनेक गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दरवर्षी १ ते ७ ऑगस्टदरम्यान साजरा होणाऱ्या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त मातांमध्ये स्तनपानाबाबत जागरूकता वाढवण्याचं आवाहन करण्यात आलंय.

मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर मेडिसिन, डॉ. मंजू कुमारी यांनी सांगितलं की, आईचे दूध हे नवजात बाळासाठी सर्वात सुरक्षित आणि संपूर्ण अन्न आहे. त्यात प्रोटीन, चरबी, कर्बोदके, जीवनसत्त्वं, खनिजं आणि पाणी योग्य प्रमाणात असतं. विशेष म्हणजे बाळ जसजसं वाढतं, तसतसं आईच्या दुधातील घटक त्याच्या गरजेनुसार बदलत जातात. त्यामुळे बाळाला आवश्यक पोषण सहज मिळते.

World Breastfeeding Week
Cholesterol Test: फक्त कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे म्हणून निर्धास्त आहात? हार्ट अटॅकचा खरा धोका सांगणारा हा 1 आकडा नक्की तपासा

जन्माच्या वेळी बाळाची रोगप्रतिकारशक्ती पूर्ण विकसित झालेली नसते. अशावेळी आईच्या दुधातील प्रतिपिंडे, रोगप्रतिकारक पेशी आणि इतर महत्त्वाचे घटक बाळाला अतिसार, श्वसनमार्गाचे संसर्ग, कानाचे संसर्ग यांसारख्या आजारांपासून संरक्षण देतात. तसंच आतड्यांमध्ये चांगले सूक्ष्मजीव तयार होण्यास मदत होते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते. जन्मानंतर येणारं पहिलं पिवळसर दूध म्हणजे कोलोस्ट्रम हे प्रतिपिंडांनी भरलेले असल्यामुळे ते बाळासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते.

तज्ज्ञांच्या मते, स्तनपानाचे फायदे केवळ बालपणापुरते मर्यादित नसतात. ज्या मुलांना स्तनपान मिळत नाही, त्यांच्यामध्ये पुढील आयुष्यात लठ्ठपणा, टाईप-२ मधुमेह आणि जीवनशैलीशी संबंधित इतर आजारांचा धोका वाढू शकतो. याशिवाय स्तनपानामुळे ॲलर्जी आणि काही रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. अकाली जन्मलेल्या बाळांसाठी आईचं दूध अधिक फायदेशीर असून त्याचा मेंदूच्या विकासावर सकारात्मक परिणाम होतो.

स्तनपानामुळे आईलाही अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. प्रसूतीनंतर गर्भाशय पूर्वस्थितीत येण्यास मदत होते, जास्त रक्तस्रावाचा धोका कमी होतो आणि गर्भधारणेपूर्वीचं वजन कमी करण्यास मदत मिळतं. दीर्घकाळ स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, अंडाशयाचा कर्करोग, टाईप-२ मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी असल्याचेही विविध अभ्यासांत दिसून आले आहे.

मात्र अनेक मातांना दूध कमी येणं, बाळाला नीट स्तनपान न होणं, स्तनाग्रांना वेदना होणं किंवा थकवा अशा अडचणींचा सामना करावा लागतो. योग्य पद्धतीने स्तनपान, डॉक्टरांचा वेळेवर सल्ला आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्यास या अडचणी सहज दूर होऊ शकतात, असं तज्ज्ञांनी सांगितले.

World Breastfeeding Week
High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

आईचे दूध हे नेहमी उपलब्ध, योग्य तापमानात आणि पूर्णपणे सुरक्षित असतं. त्यासाठी कोणतीही तयारी किंवा अतिरिक्त साधनांची गरज नसतं. त्यामुळे प्रवासात किंवा आपत्कालीन परिस्थितीतही ते बाळासाठी सर्वोत्तम अन्न ठरतं. तज्ज्ञांच्या मते, स्तनपान ही फक्त आईची जबाबदारी नसून कुटुंब, कामाचं ठिकाण, आरोग्य यंत्रणा आणि समाजानेही मातांना साथ देणं गरजेचं आहे.

World Breastfeeding Week
High cholesterol: रात्रीचं जेवण बंद केल्याने रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते? डॉक्टरांचं उत्तर ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com