चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे हल्ली वाढत्या वजनांचा अनेकजण शिकार होत आहे. ज्यामुळे लहान मुलेच नाही तर वयोवृद्धांना देखील त्याचा सामना करावा लागतोय.
1. कारले
कारले हे चवीला कडू असते. यामध्ये कमी कॅलरी असते. जी शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. जर तुम्हालाही वजन नियंत्रणात (Weight Loss Tips) ठेवायचे असेल तर कारल्याचे सेवन करा.
2. वांगी
चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वांग्याचा समावेश करु शकता. यात अँटीऑक्सिंडट्स आणि अँथोसायनिन्सचा स्त्रोत चांगला आहे. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
3. काकडी
काकडीचे सेवन केल्याने शरीराला डिटॉक्स होण्यास मदत होते. तसेच वजन कमी करण्यास देखील फायदेशीर आहे. यात पाण्याचे प्रमाण आणि फायबर अधिक प्रमाणात आहे. याचे सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यासाठी याचे नियमित सेवन करा.
4. सिमला मिर्ची
सिमला मिर्ची ही हायड्रेटिंग आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी सोबत पाण्याचे प्रमाण अधिक असते. याचे सेवन भाजी किंवा सॅलड म्हणून करु शकता.
5. भोपळा
भोपळ्यामध्ये कमी कॅलरीज असल्याने वजन कमी करण्यासाठी ते अधिक फायदेशीर आहे. याचा आहारात वापर स्मूदी, सूप किंवा भाजी म्हणून करु शकतो. यामध्ये अधिक फायबर असल्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.