
उन्हाळा हा सुट्ट्यांचा महिना किंवा ऋतु असतो. त्यामध्ये आपण अनेक ठिकाणी फिरण्याचा प्लान करतो. कारण गरमीमध्ये घरात बसणं अवघड झालेलं असतं. अशा वेळेस आपण गावाला थंड वातावरणात सुट्टीसाठी जातो. कारण गावी शहरांच्या तुलनेत जास्त प्रमाणात झाडं असतात. तसेच वाहनांची सुद्धा गडबड कमी असते. पण तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत. जिथे तुम्ही उन्हाळ्यातही गारवा अनुभवू शकता. ही ट्रीप तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत असेल तर आणखीनच धमाल येऊ शकते. चला तर जाणून घेऊ ठिकाणांची नावे आणि प्रवासाची माहिती.
तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आणि निसर्गाचे न पाहिलेले सौंदर्य अनुभवू शकता. साताऱ्याजवळ असलेले महाबळेश्वर हे थंड हवामानाचे ठिकाण आहे. मुंबईपासून हे ठिकाण २६० किमी अंतरावर आहे. तर तुम्हाला प्रवासात साधारण ५ ते ६ तास लागू शकतात.
महाबळेश्वर जवळच तुम्हाला सगळ्यात प्रसिद्ध असे थंड ठिकाण म्हणजेच पाचगणी दिसेल. शांत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखले जाणारे हे ठिकाण आहे. दर वर्षी मोठ्या संख्येने लोक इथे पर्यटनाला येत असतात. मुंबईपासून हे ठिकाण सुमारे २५० किमी अंतरावर आहे. तर तुम्हाला प्रवासाला एकूण ५ तास लागू शकतात.
रायगड जिल्ह्यातील माथेरान हे मुंबईपासून फार जवळ असेलेले थंड हवेचे ठिकाण आहे. ८० किमी अंतरावर हे ठिकाण असून मुंबईहून गाडीने २ ते ३ तासाचा कालावधी याला लागतो. मात्र माथेरानला जाण्यासाठी वाहनांना परवानगी नसल्यामुळे तुम्हाला नेरळपर्यंत गाडीने जाऊन पुढे टॉय ट्रेनने किंवा पायी प्रवास करावा लागतो.
पुणे आणि मुंबईच्या मध्येभागी ही २ प्रसिद्ध आणि थंड हवेची ठिकाणं आहेत. ही ठिकाणे त्यांच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. मुंबईपासून सुमारे ८० किमी अंतरावर असून गाडीने २ ते ३ तासांचा प्रवास आहे.
सिंधुदुर्ग जिल्हातील प्रसिद्ध ठिकाण म्हणजे आंबोली घाट आहे. तिथे तुम्हाला धबधबे, हिरण्यकेशी मंदिर आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून ८० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. गाडीने तुम्हाला ९ ते १० तासाचा प्रवास करावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.