
थंडीतल्या छान गुलाबी वातावरणात फिरायला कोणाला आवडत नाही. त्यात जर तुम्हाला गड किल्यांवर भर उन्हात चालायला आवडत नसेल, पण फिरण्याची हौस असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या लोणावळ्यातील सह्याद्रीच्या हिरवळीच्या कुशीत वसलेल्या एकवीरा देवीच्या मंदिरात नक्की जावू शकता. हा प्लान तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता. मुंबईपासून २ तासाच्या अंतरावर असणाऱ्या या मंदिरात तुम्ही एका दिवसात नव्हे तर काही तासातच पोहोचू शकता. चला जाणून घेवू त्या ठिकाणची खासियत आणि संपुर्ण प्लान.
एकवीरा देवी मंदिराजवळील लेणी
महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकवीरा देवस्थानाचा समावेश आहे. तेथील कार्ला लेणी ही बौद्धकालीन प्राचीन लेणी आहे. ही लेणी १६० ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात आहे. तर देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. १८६६ ला या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आल्याचे समजते. येथे सगळ्या कुळाचे लोक येवून एकवीरा आईचे दर्शन घेत असतात. तसेच ही देवी नवसाला पावणारी आहे. तर तुम्हालाही या मंदिरात जायचे असेल तर तुम्ही पुढील प्लान पाहू शकता.
काय आहे एकवीरा आईची कहाणी?
एकवीरा देवी मंदिर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधून दाखविले,असे म्हणतात. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वरही तिने पांडवांना दिला. एकवीरा देवी ही रेणूका मातेचा अवतार आहे. या मंदिरात जाण्यासाठी एकूण ५०० पायऱ्या आहेत.
ट्रेनने प्रवास
रेल्वे मार्ग: सेंट्रल लाईन (लोकल व मेल एक्सप्रेस) ट्रेन पकडून लोणावळा स्टेशनला उतरणे.
मुंबईहून ट्रेनला लागणारा वेळ:
लोकल ट्रेन: साधारणतः २ तास ३० मिनिटे
एक्सप्रेस ट्रेन: साधारणतः १ तास ३० मिनिटे ते २ तास
ट्रेन वेळापत्रक पाहण्यासाठी IRCTC किंवा Google Maps वापरू शकता.
स्टेशनपासून मंदिराचे अंतर:
लोणावळा स्टेशन ते एकवीरा देवी मंदिर: सुमारे 11-12 किमी
स्थानिक वाहन उपलब्ध: ऑटो, टॅक्सी किंवा बस
ऑटो रिक्षा भाडे: अंदाजे ₹300-₹500
ट्रेनने प्रवास करताना येणारा एकूण खर्च किती?
लोकल ट्रेन
मुंबई CST / दादर / ठाणे ते लोणावळा लोकल:
सिंगल जर्नी: ₹25 - ₹75 (सामान्य/प्रथम श्रेणी)
परतीचा प्रवास धरून: ₹50 - ₹150
एक्सप्रेस ट्रेन (आरक्षित सीटसह):
सामान्य डबा: ₹100 - ₹150
स्लीपर: ₹200 - ₹300
AC चेअर कार: ₹300 - ₹600
एकूण खर्च (परतीचा धरून): ₹200 - ₹1200
लोणावळा स्टेशन ते मंदिर:
ऑटो रिक्षा (एकट्यासाठी): ₹300 - ₹500 (एक मार्ग)
शेअरिंग ऑटो: ₹50 - ₹100 प्रति व्यक्ती
बस: ₹30 - ₹50 प्रति व्यक्ती
मुंबई ते एकवीरा देवी मंदिर, लोणावळा प्रवास मार्गदर्शक
कारने प्रवास
अंतर: सुमारे 97 किमी
वेळ: 1.5 ते 2 तास
मार्ग: मुंबई - पुणे एक्सप्रेसवे (सर्वात वेगवान मार्ग)
मुंबईहून पणवेल - खोपोली - लोणावळा मार्गे जावे.
लोणावळा येथून कार्ला लेणी रस्ता पकडावा, जो मंदिराकडे जातो.
मंदिराच्या पायथ्याशी पार्किंगची सोय उपलब्ध आहे.
तेथून ५००-६०० पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते.
मुंबई ते एकवीरा देवी मंदिर कारने प्रवास करताना येणारा खर्च किती?
इंधन खर्च: अंदाजे ₹1200 - ₹2000
टोल शुल्क:
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे: ₹320 (एक मार्ग)
परत येताना आणखी ₹320 = ₹640 (दोन्ही बाजूंसाठी)
एकूण खर्च: ₹1800 - ₹2600
फॅमिली / ग्रुपसाठी: स्वतःच्या कारने प्रवास करणे अधिक सोयीचे आणि स्वस्त (₹2000 - ₹3000)
भोजन खर्च:
साधे भोजन (भोजनालय / हॉटेल): ₹100 - ₹300 प्रति व्यक्ती
चहा / स्नॅक्स: ₹50 - ₹100 प्रति व्यक्ती
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.