High Blood Pressure: औषधांशिवाय BP कंट्रोल करायचाय? आजच सोडा या 3 धोकादायक सवयी

BP Control : तुमच्या दैनंदिन सवयींमुळे तुम्हाला जीवघेण्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे तुम्ही त्यात वेळेवर बदल केला पाहिजे.
BP Control
High Blood Pressuregoogle
Published On

सध्या अनेकांच्या लाइफस्टाइलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये तर बदल झालेतच पण झोपेच्या सवयींमध्येही मोठ्या प्रमाणात बदल होताना पाहायला मिळत आहेत. अशाच काही कारणांमुळे तुमचं ब्लड प्रेशरही वाढतं. याची लक्षणं सुरुवातीला जाणवत नाहीत. मात्र याचा शेवट हा मृत्यूनेही होऊ शकतो. त्यामुळे वेळीच पुढील सवयींमध्ये बदल करा.

डॉक्टर ब्लड प्रेशरचे समस्येला सायलेंट किलर असं म्हणतात. कारण सुरुवातीच्या टप्प्यात यात कोणतीच ठळक लक्षणं दिसत नाहीत. पण तो हळूहळू ह्रदय आणि रक्तवाहिन्यांचं नुकसान करतो. तुम्ही यावर औषधं घेता. पण काही त्यासोबत काही बदल केलेत तरीही तुम्हाला याचा परिणाम जाणवेल.

BP Control
Ladki Bahin Yojana: मार्च-एप्रिलचा लाडकीचा हप्ता का थांबवला? आता कोणाला मिळणार १५०० रुपयांचा लाभ? वाचा...

तज्ज्ञांच्या मते, BP नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वात आधी मीठाचं प्रमाण कमी करा. हे उपाय तुम्हाला अनेकांनी सांगितला असेल. पण याने खरोखरच शरीरात बदल जाणवतो. तसेच तुमचं हार्ट याने मजबूत बनतं. शरीराचं वजन थोडेसं कमी झालं तरी हृदयावरचा ताण कमी होऊ शकतो.

सगळ्यात मोठी आणि चुकीची सवय म्हणजे तुम्ही मद्यपानावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. पुरेशी आणि सलग ७ तास झोप घेतली पाहिजे. कारण अपुऱ्या झोपेमुळे हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. त्याने BP वाढू शकतो.

हे बदल केल्याने तुम्हाला झटपट परिणाम होताना दिसेल. पण काही रुग्णांना औषधांची गरज भासू शकते, पण जीवनशैलीतले सकारात्मक बदल हे रक्तदाब नियंत्रणाचं सर्वात महत्त्वाचं आणि प्रभावी पाऊल मानले जातं.

टीप

ही माहिती केवळ जनजागृतीसाठी असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास किंवा उपचाराबाबत निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

BP Control
LIC Scheme: महिलांसाठी LICची जबरदस्त योजना! दहावी पास असणाऱ्यांना महिन्याला मिळणार ₹७०००, लाभ कसा घेता येईल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com