Career In Pilot : पायलट व्हायचं ? भारतीय वायुसेनेत किती मिळतो पगार ? शिक्षणाची पात्रता किती ?

How To Choose Career : अनेक मुलं व त्याचे आई-वडील स्वप्न उराशी बाळगून त्यांच्या भवितव्याचा विचार करत असतील.
Career In Pilot
Career In PilotSaam Tv

Career Tips : नुकतीच दहावी-बारावीची परिक्षा पार पडली. त्यात येत्या काही दिवसांतच मुलांचे रिजल्ट लागतील. अनेक मुलं व त्याचे आई-वडील स्वप्न उराशी बाळगून त्यांच्या भवितव्याचा विचार करत असतील.

आपल्या मुलांने योग्य करिअर (Career) निवडावे असे अनेक पालकांचे मत असते. परंतु, त्याला योग्य ती दिशा मिळाली नाही की, करिअरच गणित बिघडत. अनेक तरुणांना भारतीय हवाई दलात पायलट होण्याचे स्वप्न आहे. भरमसाट पगार (Salary) व इतर सुविधांच्या बाबतीत भारतीय हवाई दल हे विमान वाहतूक क्षेत्रातील एक आकर्षक नियोक्ते आहे.

Career In Pilot
Career Options After 10th: दहावीनंतर पुढे काय ? आर्ट्स, सायन्स की कॉमर्स, कोणती स्ट्रीम बेस्ट ?

भारतीय (Indian) हवाई दलात फ्लाइंग ब्रँच, ग्राउंड ड्यूटी टेक्निकल ब्रँच आणि ग्राउंड ड्यूटी नॉन टेक्निकल ब्रँच या तीन ठिकाणी भरती केली जाऊ शकते. भारतीय हवाई दलात वैमानिकांची भरती फ्लाइंग ब्रँचद्वारे केली जाते. हवाई दलात तीन प्रकारचे वैमानिक आहेत - फायटर पायलट, ट्रान्सपोर्ट पायलट आणि हेलिकॉप्टर पायलट.

1. भारतीय हवाई दलात पायलट होण्याचे 4 मार्ग

भारतीय हवाई दलात बारावीनंतर पायलट होऊ शकतो. यासाठी चार मार्ग आहेत – UPSC NDA परीक्षा, Combined Defence Services Exam म्हणजेच CDS, Air Force Common Admission Test (AFCAT) आणि NCC स्पेशल एंट्री स्कीम.

Career In Pilot
Shweta Shinde : चाळीशी पार तरीही चाहत्यांना भूरळ कायम...!

2. UPSC एनडीए परीक्षा (Exam)

12वी नंतर UPSC NDA परीक्षेद्वारे भारतीय हवाई दल, लष्कर आणि नौदलात भरती होऊ शकते. NDA परीक्षेसाठी वय 16 ते 19 वर्षे दरम्यान असावे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एनडीएच्या माध्यमातून हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रांच, ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल शाखेत भरती केली जाते.

3. संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS)

सीडीएस परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय हवाई दलात कायमस्वरूपी कमिशन मिळू शकते. यासाठी वय 20 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर BA/B.Sc/B.Com उत्तीर्ण झाले पाहिजे. भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा BE/B.Tech केलेले असावे.

Career In Pilot
Feeling sleepy after eating : दुपारी जेवल्यानंतर सुस्ती का येते?

4. एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी)

भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रँचमध्ये भरती होण्यासाठी कोणीही एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (एएफसीएटी) परीक्षेत बसू शकतो. AFCAT परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय हवाई दलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन उपलब्ध आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन सुरुवातीला १४ वर्षांसाठी असते. जे नंतर वाढवताही येईल.

AFCAT साठी वय 20 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवाराकडे DGCA द्वारे जारी केलेला व्यावसायिक पायलट परवाना असल्यास, कमाल वयोमर्यादा 26 वर्षे आहे. शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर बारावी गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बारावीत किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. यासह, BA/B.Sc/B.Com किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा किमान ६०% गुणांसह BE/B.Tech.

5. एनसीसी विशेष प्रवेश योजना

अविवाहित महिला आणि पुरुष दोघेही एनसीसी स्पेशल एंट्री योजनेद्वारे हवाई दलात सामील होऊ शकतात. यासाठी एनसीसी एअरविंग सीनियर डिव्हिजन सी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. NCC स्पेशल एंट्री स्कीममधून भरती करताना कायमस्वरूपी कमिशन उपलब्ध आहे. वय 20 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. जर व्यावसायिक पायलट परवाना असेल तर कमाल वयोमर्यादा 26 वर्षे असेल.

Career In Pilot
Mistake Women should not cross After age of 30th : वयाची तिशी ओलांडल्यानंतर स्त्रियांनी करु नये या चुका

शिक्षणाबद्दल बोलायचे तर १२वी (पीसीएम) किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवीमध्ये किमान ६०% गुण असणे आवश्यक आहे. किंवा BE/B.Tech किमान 60% गुणांसह.

6. पगार

भारतीय वायुसेनेच्या AFCAT वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, वायुसेना अधिकाऱ्याचा प्रारंभिक पगार 56100 रुपये प्रति महिना आहे. फ्लाइंग ऑफिसरची वेतनश्रेणी रु.56100-110700 आहे. फ्लाइंग ऑफिसरला लष्करी सेवा वेतन, उड्डाण भत्ता, तांत्रिक शाखेच्या अधिकाऱ्यांना तांत्रिक भत्ता व्यतिरिक्त दरमहा 15500 रुपये मिळतात. इतर भत्त्यांमध्ये वाहतूक, मुलांचे शिक्षण, एचआरए इ.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com