Walking Exercise : चालला तो जगला; थांबला तो संपला, वाचा महत्वाचे फायदे!

Walking Benefits : चालणे आपल्या आरोग्यासाठी महत्वाचे का आहे? तसेच त्याचे फायदे काय याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
Walking Exercise
Walking Exercise Saam Tv
Published On

सध्या प्रत्येक डॉक्टर नागरिकांना चालण्याचा सल्ला देत आहे. चालणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले असून हा एक अतिशय सोपा व्यायाम आहे. चालल्याने आपल्या आरोग्याला कोणते फायदे मिळतात याची माहिती नुकतीच एका संशोधनातून समोर आली आहे. त्यामुळे आज हिच माहिती जाणून घेणार आहोत.

Walking Exercise
Exercise Side Effects : जास्त व्यायाम करताय? वाढेल डिहायड्रेशनचा धोका

संपूर्ण दिवसभरातून व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये व्यक्ती तासंतास लॅपटॉप किंवा कंप्यूटरवर काम करतात. एकाच जागी बासून काम केल्याने आपलं वजन वाढतं. त्यामुळे व्यायाम करावा लागतो. मात्र व्यायामाचा अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे यावर पर्याय म्हणजे चालणे. आज या बातमीतून चालण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

हृदय निरोगी राहतं

एकाच जागी बसून काम केल्याने शरीराची जास्त हालचाल होत नाही. शरीर स्थूल होत जातं. लठ्ठ झाल्याने व्यक्तीच्या शरीरात हृदयाला कमी जास्त प्रमाणात रक्त पुरवठा होतो. नसा ब्लॉक होतात त्यामुळे हृदयविकाराचा धोका असतो. मात्र चालल्याने हृदयासह श्वसनक्रियेला सुद्धा फायदा होतो.

हाडांचे आरोग्य सुधारते

दिवसातून किमान अर्धा तास तरी चालले पाहिजे. यामुळे आपली हाडे मजबूत होतात. हाडांना ताकद मिळते आणि बळ येते. दररोज चालणाऱ्या व्यक्तीती हाडे ठिसूळ नसतात.

कॅलरी कमी होतात

वजन वाढले असेल तर त्या व्यक्तींसाठी चालणे उत्तम उपाय आहे. तुम्ही कधीही कितीही चालले तरी हरकत नाही. कारण चालल्याने आपली ऊर्जा खर्च होते आणि वजन देखील कमी होतं. ज्या व्यक्तींना सकाळीच चालण्याची सवय असते त्यांना आपल्या भुकेवर नियंत्रण ठेवता येतं.

आयुष्य वाढतं

प्रत्येकाला माहिती आहे की व्यक्तीचे आयुष्य दिर्घकाळ असावे यासाठी त्याचे आरोग्य सुदृढ आणि निट असले पाहिजे. सुदृढ आयुष्यासाठी दररोज चालले पाहिजे. कारण चालल्याने हार्ट, डायबेटीज सारख्या विविध समस्या सुटतात. त्यामुळे आपलं आयुष्य आणखी जास्त वाढतं.

Walking Exercise
Exercise Tips : रात्री झोपताना व्यायाम करणे योग्य की अयोग्य?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com