Heart Attack Symptoms: हृदयविकाराचा धोका का वाढतोय? नेमकं काय आहे कारण जाणून घ्या

Heart Health : वाढत्या हृदयविकाराच्या धोक्याचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.
हृदयविकाराचा धोका का वाढतो
Heart AttackYandex
Published on
जंकफूड खाल्ल्यामुळे
Junk FoodYandex

जंकफूड खाल्ल्यामुळे

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. जंकफूडच्या अतिसेवनामुळे तुमच्या शराराला अनेक आजार होण्याची शक्यता असते

कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढते
FatYandex

कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढते

तुम्ही जास्त प्रमाणात तेलटक किंवा बाहेरचं खात असाल तर तुमच्या शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढते. तुमच्या शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे तुम्हाला अनेक आजारांचे संसर्ग होऊ शकतो. त्यासोबतच वाढलेल्या कॉलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

मद्यपान
DrinkingYandex

मद्यपान

तुम्ही जर जास्त प्रमाणात मद्यपान करत असाल तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका असण्याची शक्यता असते त्यामुळे मद्यपानाची सवय आजच सोडा.

रक्तदाब
Blood Pressure Yandex

रक्तदाब

तुमच्या शरीरातील उच्च रक्तदाबामूळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका असू शकतो त्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवा.

वजन वाढ
Belly Fat Yandex

वजन वाढ

तुमच्या वजनामध्ये वाढ झाल्यामुळे तुमच्या हृदयावर दबाव येतो ज्यामुळे हृदया संबंधीत आजारांचा धोका वाढू शकतो. वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका होऊ शकतो.

मधुमेहाची समस्या
sugarYandex

मधुमेहाची समस्या

तुमच्या शरीरात मधुमेहाचा धोका वाढल्यामुळे तुमच्या शरीरातील साखर वाढते ज्यामुळे तुमच्या हृदयावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

हृदयविकाराचा धोका
Salt Yandex

हृदयविकाराचा धोका

तुमच्या आहारात जास्त प्रमाणात मीठाचे आणि साखरेचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

तणाव
Manage Stress at OfficeYandex

तणाव

जास्त तणावामुळे आणि जास्त धावपळीमुळे तुम्हाला थकवा जाणवतो ज्यामुळे तुमच्या हृदयावर दबाव येतो आणि हृदयविकाराचा धोका असू शकतो.

टीप
DoctersSaam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited By: Nirmiti Rasal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com