Viral Video : सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही करते त्यात जर डोळ्यांचे सौंदर्य असेल तर आपण अनेक गोष्टी करतो. डोळे (Eye) सुंदर दिसण्यासाठी आपण त्यावर अनेक रंगरंगोटी करतो त्यात जर काहींना चष्मा असेल तर ते तो वापरण्यास टाळतात.
सुंदर दिसण्यासाठी बरेच लोक चष्माऐवजी कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांचे सौंदर्य अजूनच सुंदर दिसते पण जर ते काढायला विसरलात तर... (Latest Marathi News)
सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक डॉक्टर महिलेच्या डोळ्यांमधून अनेक कॉन्टॅक्ट लेन्स काढताना दिसत आहे. कॅलिफोर्नियातील एका डॉक्टरने एका महिलेच्या (Women) डोळ्यात अडकलेल्या 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या, ज्या ती रोज रात्री काढायला विसरली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नवीन घालायची. डॉक्टरांनी त्याचा व्हिडिओ आणि फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
डॉ. कॅटरिना कुर्तिवाने 13 सप्टेंबरला हा व्हिडिओ पोस्ट केला होता, जो आता व्हायरल झाला आहे. डॉक्टर रुग्णाच्या डोळ्यातून एकामागून एक लेन्स कशी काढत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना डॉक्टरांनी लिहिले की, " डोळ्यांमधून 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढल्या आहेत. हा माझ्या क्लिनिकच्या वास्तविक जीवनातील व्हिडिओ आहे. कधीही लेन्स लावून झोपू नका."
रात्री झोपण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्स काढून दुसर्या दिवशी सकाळी नवे घालायला कोणी विसरलेले दिसणे दुर्मिळ आहे. तेही सलग २३ दिवस!
मला काल माझ्या कार्यालयात कॉन्टॅक्ट लेन्स देण्याची संधी मिळाली." त्यांनी असेही लिहिले की, "हे लेन्स वेगळे करण्यासाठी मला ज्वेलर्सद्वारे वापरलेले साधन वापरावे लागले. या लेन्स महिनाभर पापणीच्या आत होत्या, त्यामुळे ते अडकले.
लेन्सच्या रंगाचे स्पष्टीकरण देताना डॉक्टर म्हणाले, "अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्स आधीपासून थोड्याशा निळ्या रंगाच्या टिंटसह येतात. मी ते काढण्यासाठी फ्लोरेक्स नावाचा विशेष पदार्थ वापरला, त्यामुळे ते निळ्याऐवजी हिरवे दिसत आहेत."
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.