Cancer Risk: व्हिगन डाएटमुळे कॅन्सरचा धोका तब्बल 25% होतो कमी; नव्या संशोधनातून मोठी बाब समोर

Vegan Diet for Cancer Risk: एका मोठ्या जागतिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, जे लोक व्हिगन डाएट फॉलो करतात, त्यांच्यामध्ये कर्करोग होण्याचा धोका मांसाहार करणाऱ्या लोकांच्या तुलनेत २५ टक्क्यांनी कमी असतो.
Vegan Diet for Cancer Risk
Vegan Diet for Cancer Risksaam tv
Published On
Summary
  • व्हिगन आहार घेणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका २५% कमी असतो.

  • शाकाहारी लोकांमध्ये कॅन्सरचा धोका १२% कमी असतो.

  • कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका २१% ने कमी होतो.

तुम्ही कधी विचार केलाय का, की फक्त आपल्या ताटातून मांसाहारी पदार्थांना दूर ठेवलं तर तुम्ही गंभीर आजारांचा धोका कमी करू शकता? नुकत्याच झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. जे लोक शाकाहारी किंवा पूर्णपणे वनस्पती आधारित म्हणजेच व्हिगन आहार घेतात, त्यांच्यात मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत कॅन्सरचा धोका लक्षणीय कमी आढळला आहे.

80 हजार लोकांवर संशोधन

अमेरिकेतील लोमा लिंडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी उत्तर अमेरिकेत राहणाऱ्या ‘सेव्हंथ डे अॅडव्हेंटिस्ट चर्च’च्या जवळपास 80 हजार लोकांवर तब्बल आठ वर्षे संशोधन केलं.

या अभ्यासात दिसून आले की,

  • पूर्णपणे व्हिगन आहार घेणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका २५% कमी होता.

  • शाकाहारी लोकांमध्ये हा धोका १२% कमी होता.

  • दूध आणि अंडी खाणाऱ्यांमध्ये ब्लड कॅन्सरचा धोका देखील कमी दिसून आला.

कोणत्या कर्करोगांचा धोका कमी झाला?

  • कोलोरेक्टल कॅन्सर – २१% कमी

  • पोटाचा कॅन्सर – ४५% कमी

  • लिम्फोमा – २५% कमी

Vegan Diet for Cancer Risk
Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरचं मूळ कारण तज्ज्ञांनी काढलं शोधून; आता गंभीर आजार होण्यापूर्वीच मिळू शकणार उपचार

जीवनशैलीचा मोठा परिणाम

संशोधनातून हे देखील समोर आले की, मांस न खाणारे लोक साधारणपणे सडपातळ असतात, कमी अल्कोहोलचं सेवन करतात, धूम्रपान करत नाहीत आणि व्यायाम अधिक करतात. ते हार्मोनल औषधांचाही कमी वापर करतात. शास्त्रज्ञांनी हे घटक लक्षात घेऊन माहिती घेतली असली तरीही त्यांनी मान्य केलं की, जीवनशैलीचा परिणाम पूर्णपणे नाकारता येत नाही.

वाढते कर्करोगाचे प्रमाण

जगभरात ५० देशांपैकी २७ देशांमध्ये ५० वर्षांखालील लोकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सर झपाट्याने वाढतो आहे. इंग्लंडमध्ये दरवर्षी ३.६% दराने वाढ होत असल्याची नोंद आहे तर अमेरिकेत जवळपास २% वार्षिक वाढ होताना दिसतेय.

Vegan Diet for Cancer Risk
Symptoms of kidney failure: किडनी खराब झाल्यावर पायांमध्ये दिसून येणारे 3 मोठे बदल ओळखा; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणं?

  • पोटदुखी, सूज

  • सतत थकवा आणि श्वास घेण्यास त्रास

  • पोटात गाठ

  • मलात रक्त किंवा गुदद्वारातून रक्तस्राव

Vegan Diet for Cancer Risk
Guruwar che Upay: गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंचे हे उपाय अवश्य करा; अशुभ प्रभावातून मिळेल सुटका

या संशोधनातून स्पष्ट होतंय की, मांस आणि डेअरी पदार्थ टाळून, वनस्पती-आधारित आहार म्हणजेच व्हिगन डाएट घेतल्यास आणि आरोग्यदायी जीवनशैली पाळून कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. म्हणून आजपासूनच आहारात भाज्या, डाळी, फळं आणि धान्य यांना अधिक समावेश करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com