
ऑफिसमधील मित्रांचा आयुष्यावर मोठा परिणाम होतो.
खासगी माहिती शेअर करणे धोकादायक ठरू शकते.
नोकरी सोडण्याची घोषणा लवकर करू नये.
गुरुवारचा दिवस भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांना अर्पण मानला जातो. या दिवशी विष्णूंची विशेष पूजा केल्यास त्यांची कृपा लाभते आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. गुरुवारी व्रत केल्यानेही अनेक शुभफल मिळतात. काही वेळा जीवनातील दुःख आणि अडथळे लवकर दूर होत नाहीत.
ज्योतिष्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, गुरुवारी काही खास उपाय केल्यास लवकर सकारात्मक परिणाम मिळू शकतात. जाणून घेऊया, असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे आर्थिक प्रगती, शत्रूंवर विजय आणि इतर अनेक लाभ मिळू शकतात.
गुरुवारी भगवान विष्णूंना चंदनाचा तिलक लावा आणि त्यांच्या समोर चंदनाची धुपबत्ती पेटवा. असं केल्याने धनसंबंधी अडचणी कमी होतात आणि आर्थिक स्थितीत दिवसेंदिवस सुधारणा होते. या वेळी मनोभावे विष्णूंकडे धनवृद्धीची प्रार्थना करा.
पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण झाला असेल किंवा प्रेम कमी झालं असेल तर गुरुवारी दूध आणि तांदळाची खीर बनवून त्यात केशर टाका आणि ती श्री विष्णूंना अर्पण करा. हा उपाय केल्याने आपसातील प्रेम आणि सामंजस्य वाढते.
शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी गुरुवारी एक पिवळा कपडा घ्या आणि त्यावर हळदीच्या पाण्याने शत्रूचं नाव लिहा. हा कपडा भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करा. या उपायामुळे शत्रूंवर विजय मिळण्यास मदत होते.
संततीच्या प्रगतीसाठी गुरुवारी नवीन पिवळा कपडा घ्या आणि तो मुलाच्या किंवा मुलीच्या हातून स्पर्श करून घ्या. नंतर हा कपडा विष्णू मंदिरात अर्पण करा. मंदिरात बसून “ॐ ऐं क्लीं बृहस्पतये नमः” हा मंत्र 11 वेळा जपा आणि संततीच्या सुख-समृद्धीची प्रार्थना करा.
घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर गुरुवारी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा करा. पूजेदरम्यान पाच गोमती चक्र त्यांच्या चरणी ठेवा. पूजा पूर्ण झाल्यावर ही गोमती चक्र पिवळ्या कपड्यात बांधून छोटी पोटली तयार करा आणि ती आपल्या जवळ ठेवा.
ऑफिसमध्ये मित्रांना नोकरी सोडण्याबद्दल का सांगू नये?
ती माहिती लीक झाल्यास सध्याच्या कामावर परिणाम होऊ शकतो.
बॉस किंवा सहकाऱ्यांविषयी तक्रार करणे का टाळावे?
नकारात्मक बोलणे मनावर आणि नात्यांवर वाईट परिणाम करते.
पगाराबद्दल चर्चा करणे का चुकीचे आहे?
पगाराची तुलना जळफळाट आणि आत्मसंशय निर्माण करू शकते.
काम न करता व्यस्त असल्याचं दाखवणे का टाळावे?
तुमची प्रतिमा बिघडू शकते आणि नोकरीचा धोका असतो.
ऑफिसमध्ये मर्यादा का राखणे गरजेचे आहे?
मर्यादा राखल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध सुरक्षित राहतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.