Vat Purnima 2023 : यंदा वटपौर्णिमा कधी आहे ? जाणून घ्या महत्त्व व शुभ मुहूर्त

Jeshtha Purnima Puja Time : ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. यंदा ही वटपौर्णिमा ३ जूनला आहे.
Vat Purnima 2023
Vat Purnima 2023Saam Tv
Published On: 

Vat Purnima 2023 Date : ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. यंदा ही वटपौर्णिमा ३ जूनला आहे. यादिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करुन आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थाना करतात.

वटपौर्णिमा हा महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, गुजरात इत्यादी देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जाणारा पारंपरिक सण आहे. उत्तर भारतात भाविक ज्येष्ठ अमावस्येला उपवास करतात, तर दक्षिण भारतात लोक ज्येष्ठ पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या दिवशी उपवास (Fast) करतात.

Vat Purnima 2023
Nirjala Ekadashi: निर्जला एकादशीला जुळून येतोय शुभ योग, जाणून घ्या व्रताचे महत्त्व व पूजा विधी

वटपौर्णिमा व्रतामध्ये विवाहित स्त्रिया (Women) उपवासासह वट सावित्री व्रताची कथा ऐकतात आणि त्यानंतर त्या वटवृक्षाची विधीपूर्वक पूजा करतात. यंदा वटपौर्णिमेला 3 शुभ योग तयार होत आहेत. जाणून घेऊया वटपौर्णिमेची तिथी, पूजा मुहूर्त व शुभ योगांबद्दल

1. तिथी

3 जूनला सकाळी 11.16 मिनिटांनी वटपौर्णिमा तिथी सुरु होत आहे तर 4 जून, रविवार, 09:11 वाजता ती संपते

2. पूजा मुहूर्त

  • 3 जून, शनिवार, सकाळी 07:07 ते 08:51

  • दुपारी 12:19 ते 05:31 पर्यंत

  • अमृत-उत्तम मुहूर्त

  • दुपारी 03:47 ते संध्याकाळी 05:31

Vat Purnima 2023
Shukra Gochar 2023 : कर्क राशीत शुक्र ग्रहाचे गोचर ! येत्या 42 दिवसांत या तीन राशी होतील मालामाल, प्रेमयुगुलांचे येणार अच्छे दिन...

3. वट सावित्री पौर्णिमेला 3 शुभ योग

  • वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 3 जून, शनिवारी तीन शुभ योग तयार होत आहेत.

  • शिवयोग : सकाळपासून दुपारी 02:48 पर्यंत.

  • सिद्धी योग: दुपारी 02:48 ते संपूर्ण रात्र.

  • रवि योग: सकाळी 05:23 ते 06:16 पर्यंत

4. वट सावित्रीचे महत्त्व

असे म्हटले जाते की, ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवांचा येथे सहवास असतो. त्यामुळे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि असे मानले जाते की हे व्रत केल्याने ते आपल्या पतीला सौभाग्य आणि भाग्य मिळवून देतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.