

ऑफिसची बॅग असो किंवा पाकीट... वास्तुशास्त्राचा या प्रत्येक गोष्टीशी संबंध आहे. वास्तू शास्त्रामध्ये घराच्या दिशेशिवाय अनेक असे नियम सांगितले आहेत जे आपल्या दैनंदिन गोष्टींशी संबंधित आहेत. अनेकदा लोक ऑफिसच्या बॅगमध्ये काही वस्तू ठेवतात, ज्याची क्वचितच गरज असते.
कळत-नकळत अनेक वेळा अशा गोष्टी बॅगेत ठेवल्या जातात, ज्यांच्या ऊर्जेमुळे आपल्या कामामध्ये बाधा येते. जाणून घेऊया की ऑफिसच्या बॅगमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ठेवू नयेत.
वास्तुशास्त्रानुसार, ऑफिस बॅग नेहमी व्यवस्थित ठेवली पाहिजे. शास्त्राच्या नियमानुसार, जुनी बिलं कधीही पिशवीत ठेवू नयेत. त्यांच्या ऊर्जेमुळे हळूहळू मनात गोंधळ निर्माण होतो. अशा परिस्थितीत मन कामात योग्यरित्या एकाग्र होऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे तुमच्या बॅगेत कधीही धारदार वस्तू ठेवू नये. यामुळे नकारात्मकता निर्माण होते. जर एखादी महत्त्वाची वस्तू ठेवायची असेल तर ती पॅकेटमध्ये ठेवून तुमच्या बॅगमध्ये ठेवावी. ह्या वस्तू बॅगेत राहिल्याने व्यावसायिक जीवनात अडचणी येतात. त्याचप्रमाणे तुमची प्रगतीही होत नाही.
ऑफिसची बॅग वेळोवेळी स्वच्छ करण्याचा प्रयत्न ठेवा. त्याचप्रमाणे तुटलेलं पेन कधीही बॅगमध्ये ठेवू नये. जर तुम्ही बॅगमध्ये तुटलेलं चार्जर किंवा हेडफोन ठेवत असाल तर ते ताबडतोब बॅगमधून बाहेर काढा. त्यांच्यामुळे आपल्या ऊर्जेवर वाईट परिणाम होतो.
तुमच्या पर्सनल हायजिनच्या वस्तू वेगळ्या पाउचमध्ये ठेवल्या पाहिजेत. हे पाउच तुम्ही तुमच्या हँडबॅगमध्ये ठेऊ शकता. किंवा तुमच्याकडे ऑफिसचा डॉवर असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील ठेऊ शकता.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.