Vastu Tips : चुकीच्या पद्धतीने जेवताय? वाढू शकतो कर्जाचा डोंगर, वास्तुशास्त्रातील नियम एकदा पाहाच

Vastu Horoscope : वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचे विशेष असे महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा आणि कोना हा अधिक महत्त्वाचा असतो. परंतु, बरेचदा घरात आपल्याला सतत नकारात्मकता जाणवते. त्यामुळे आपापसात भांडणे होतात.
Vastu Tips
Vastu TipsSaam Tv
Published On

Vastu Tips For Home :

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचे विशेष असे महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा आणि कोना हा अधिक महत्त्वाचा असतो. परंतु, बरेचदा घरात आपल्याला सतत नकारात्मकता जाणवते. त्यामुळे आपापसात भांडणे होतात.

अनेकवेळा कष्ट करुनही अपेक्षित यश मिळत नाही. आयुष्यात कितीही संघर्ष केला तरी आपली कामे रखडलेली राहातात. प्रगतीच्या कामात अडथळे निर्माण होतात. सतत कर्जाचा डोंगर उभा राहातो.

शास्त्रानुसार आर्थिक (Money) समस्या, नोकरी (Job) किंवा व्यवसायात सतत अपयश येत असेल तर कळत नकळत आपल्याकडून झालेल्या चुका असू शकतात. त्यातील एक चूक जेवण्याची चुकीची पद्घत. वास्तुशास्त्रात जेवणाच्या संबंधित काही खास नियम सांगण्यात आले आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.

Vastu Tips
Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : फेब्रुवारी महिन्यात मोठ्या ग्रहांचे संक्रमण! हा आठवडा थोडा चिंताजनक, खर्चात होईल भरमसाठ वाढ

1. कर्ज वाढते

जर तुम्ही घरात अंथरुणावर बसून अन्न खात असाल तर नकारात्मक ऊर्जा तयार होऊन गरिबी पसरते. वास्तुनुसार (Vastu Tips) अंथरुणावर बसून खाल्ल्याने आरोग्याबरोबरच धनाची हानी होते. त्यामुळे व्यक्ती हळूहळू कर्जात बुडते.

2. योग्य दिशा

शास्त्रानुसार अन्न खाण्याची योग्य दिशा पूर्व किंवा उत्तर सांगितली आहे. या दिशेला तोंड करुनच अन्न खावे. पूर्वेकडे तोंड करुन अन्न खाल्ल्याने मानसिक तणावापासून समस्यांपासून आराम मिळतो. दक्षिणेकडे तोंड करुन अन्न खाऊ नये.

3. या गोष्टी लक्षात ठेवा

हिंदू धर्मात संपत्तीचे आठ प्रकार सांगण्यात आले आहे. त्यापैकी अन्नसंपत्ती ही देखील एक संपत्ती आहे. अन्नपूर्णा ही अन्नाची देवी आहे. जेवताना शूज आणि चप्पल घालू नका. यामुळे अन्नपूर्णा देवी आणि लक्ष्मीचा अनादर होतो. असे केल्याने पैशांची कमतरता भासते. कर्जाचा बोझा वाढतो.

Vastu Tips
Mahabaleshwar Travel Place : महाबळेश्वरला फिरायला जाताय? मॅप्रो गार्डनच नाही तर या पर्यटनस्थळांनाही द्या भेट

4. ही खबरदारी घ्या

अस्वच्छ स्वयंपाकघर नेहमी नकारात्मकता आणते. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरातील भांडी नेहमी स्वच्छ करुन ठेवावी यामुळे धनहानी टळते. या सगळ्या गोष्टींची काळजी घेतल्यास कर्जापासून मुक्ती होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com