Valentine Day 2024 : IRCTC चा कपल प्लान! 'व्हॅलेंटाइन डे' ला पार्टनरसोबत फिरा थायलंड, बजेटमध्ये करा टूर

Thailand IRCTC Tour: Full Package, Booking Process | तुम्ही देखील यंदाच्या व्हॅलेंटाइन डे ला पार्टनरसोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर IRCTC ने कपल्ससाठी भन्नाट टूर पॅकेज आणले आहे. तुम्हालाही तुमच्या पार्टनरसोबत फिरायला जायचे असेल तर तुम्ही स्वस्तात मस्त थायलंडला जाऊ शकतात.
Valentine Day 2024, Thailand IRCTC Tour
Valentine Day 2024, Thailand IRCTC TourSaam Tv
Published On

IRCTC Tour Package For Thailand:

फेब्रुवारी महिना सुरु झाला की, अनेक प्रेमीयुगलांना वेध लागतात ते व्हॅलेंटाइन डे च. फेब्रुवारी हा महिना प्रेमीयुगलांसाठी अधिक खास असतो. या काळात अनेक जोडपी विविध माध्यमातून किंवा नव्या भेटवस्तू, फिरण्याचा प्लान करुन आपले प्रेम व्यक्त करतात.

जर तुम्ही देखील यंदाच्या व्हॅलेंटाइन डे ला पार्टनरसोबत (Partner) फिरण्याचा प्लान करत असाल तर IRCTC ने कपल्ससाठी (Couple) भन्नाट टूर पॅकेज आणले आहे. तुम्हालाही तुमच्या पार्टनरसोबत फिरायला जायचे असेल तर तुम्ही स्वस्तात मस्त थायलंडला जाऊ शकतात. थायलंडला तुम्ही पट्टाया आणि बँकॉकला भेट देऊ शकतात. जाणून घेऊया टूर (Tour) पॅकेज.

पॅकेजचे नाव- Treasures of Thailand, Valentine's Day Special Ex Hyderabad

पॅकेज कालावधी- 3 रात्री आणि 4 दिवस

प्रवास मोड- फ्लाइट

फिरण्याचे ठिकाण- पट्टाया आणि बँकॉक

प्रवास कधी करु शकाल?

१४ फेब्रुवारी २०२४

थायलंडला जाण्यासाठी तुम्हाला हैदराबादवरुन तुम्हाला फ्लाइट मिळेल.

1. खर्च किती?

  • या टूर पॅकेजसाठी तुम्हाला किमान ४८,४७० रुपये मोजावे लागतील. यामध्ये तुमचे फ्लाइट तिकीट, हॉटेलमध्ये राहाण्याचा खर्च आणि जेवणाचा खर्चाचा समावेश आहे.

  • जर तुम्हाला यामध्ये सोलो ट्रिप करायची असेल तर तुम्हाला ५६,८४५ रुपये खर्च करावे लागतील.

  • जर तुम्ही कपल्स जात असाल तर प्रत्येक व्यक्तीला ४८,४७० रुपये मोजावे लागतील.

  • फॅमिलीसोबत जात असाल तर प्रति व्यक्ती ४८,४७० रुपये तर लहान मुलांना बेडसह ४५,५७५ रुपये आणि बेडशिवाय ४१,५५० रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com