UPI ट्रांजेक्शन करताना या ५ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा बँक खातं होईलं रिकामं

5 UPI Tips For Safe Online Payments : जर तुम्ही देखील ऑनलाइन पेमेंटसाठी युपीआय वापरत असाल तर सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. जर युपीआय ट्रांजेक्शन करत असाल तर या ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
5 UPI Tips For Safe Online Payments
5 UPI Tips For Safe Online PaymentsSaam Tv
Published On

UPI Transaction Tips :

सध्याच्या ऑनलाइन युगात युपीआयचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. फोन पे, गुगल पे आणि पेटीएम सारख्या युपीआय आयडीचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हा भारतातील सर्वात लोकप्रिय पेमेंट पद्धतींपैकी एक बनला आहे.

परंतु, अनेकदा युपीआयद्वारे पैसे (Money) ट्रान्सफर (Transfer) करताना आपल्यासोबत फसवणुक होते. सध्या फसवणुकीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. जर या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. जर तुम्ही देखील ऑनलाइन पेमेंटसाठी युपीआय वापरत असाल तर सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा तुमचे बँक (Bank) खाते रिकामे होऊ शकते. जर युपीआय ट्रांजेक्शन करत असाल तर या ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

1. पासवर्ड

बँक खाते आणि UPI अॅप सुरक्षित ठेवायचे असेल तर पिन, पॅटर्न, फेस, अनलॉक, फिंगरप्रिट यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे अधिक महत्त्वाचे आहे. जेव्हा पासवर्ड आणि पिन सेट करला तेव्हा सगळ्यात कठीण पासवर्ड सेट करा.

5 UPI Tips For Safe Online Payments
Air Conditioner चा हा मोड ऑन करा, वीज बिल येईल कमी

2. बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि अॅप लॉक

बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि पिन सेट करण्याचा पर्याय सर्व प्रकारच्या ऑनलाइन पेमेंट अॅप्लिकेशनमध्ये अॅड करु शकता. फोनवर पासवर्ड टाकण्यासोबतच अॅपमध्ये येणाऱ्या ऑथेंटिकेशन प्रक्रियेचा अवलंब करा.

3. UPI अॅप वेळोवेळी अपडेट करा

अॅप बऱ्याच काळापासून अपडेट न केल्यास हॅकर्सना आणि स्कॅमर्सना ते लगेच उपलब्ध होते. त्यामुळे जेव्हाही अॅप अपडेटचे ऑप्शन येते तेव्हा ते लगेच अपडेट करा. कंपनी प्रत्येक अपडेटमध्ये अनेक प्रकारची सुरक्षा देते.

5 UPI Tips For Safe Online Payments
VI चा धमाकेदार प्लान! दिवसाला ६ तास फ्रीमध्ये वापरा अनलिमिटेड डेटा, ऑफर पाहा

4. सार्वजनिक वायफायचा वापर नको

अनेकदा आपण रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, शॉपिंग कॉम्प्लेक्स यांसारख्या ठिकाणी उपलब्ध असलेले सार्वजनिक वायफायद्वारे ऑनलाइन पेमेंट करतात. यामुळे बँक खाते हॅक होते. ऑनलाइन पेमेंटसाठी सार्वजनिक वाय-फाय कधीही वापरु नका. हॅकर्सद्वारे सार्वजनिक वाय-फायद्वारे फोन आणि बँक खाते हॅक केले जाऊ शकते.

5. पेमेंट हिस्ट्री

आपण अनेकदा ऑनलाइन पेमेंट करतो परंतु त्यांच्या ट्रान्जेंक्शन हिस्ट्रीकडे लक्ष देत नाही. ही सवय आपण बदलायला हवी. त्यामुळे तुमचे नुकसान टाळण्यासाठी आपण ट्रान्जेंक्शन हिस्ट्री तपासायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com