Air Conditioner चा हा मोड ऑन करा, वीज बिल येईल कमी

Reduce Your AC Bill This Summer : जर तुम्ही देखील तुमच्या घरी एसी लावण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे हजारो रुपये वाचवू शकता.
Air Conditioner, Reduce Your AC Bill This Summer
Air Conditioner, Reduce Your AC Bill This SummerSaam Tv
Published On

Air Conditioner Lower Electric Bill :

मार्च महिना सुरु झाला की, वातावरणात बदल होतो. त्यामुळे आपल्याला अधिक प्रमाणात गरम होऊ लागते. उन्हाळा सुरु झाला की, आपल्या गर्मी सहन होत नाही. यामुळे आपण एसीचा अधिक प्रमाणात वापर सुरु करतो.

दिवसभर ऑफिसमध्ये (Office) एसीत बसल्यामुळे आपल्याला घरी गर्मी असाह्य होते. जर तुम्ही देखील तुमच्या घरी एसी लावण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स (Tips) सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे हजारो रुपये (Money) वाचवू शकता.

एअर कंडिशनरमध्ये अनेक मोड दिलेले असतात. बहुतेक लोक एसी वापरतात परंतु, त्याचा मोड योग्य प्रकारे वापरत नाही ज्यामुळे वीजेचे बील अधिक येते. अशातच आज आम्ही तुम्हाला एका खास मोडबद्दल सांगणार आहोत जे चालू केल्याने तुमचे वीज बिल कमी होते. घरी एसी वापरत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची ठरेल.

Air Conditioner, Reduce Your AC Bill This Summer
VI चा धमाकेदार प्लान! दिवसाला ६ तास फ्रीमध्ये वापरा अनलिमिटेड डेटा, ऑफर पाहा

1. एअर कंडिशनर

एअर कंडिशनरमध्ये ड्राय मोड, हीट मोड, स्लीप मोड, कूल मोड आणि ऑटो मोड आहेत. हे सर्व मोड वेगवेगळ्या परिस्थिती आणि हवामानानुसार सेट केले जातात. जर तुम्ही या मोड्सचा योग्य वापर केला तर तुम्ही एसीचे लाइफ वाढवू शकता पण विजेचे बिलही वाढवण्यापासून रोखू शकता. यासाठी तुम्ही एसीला ऑटो मोडवर ठेवा.

2. या मोडमुळे वीज बील होईल कमी

एअर कंडिशनर ऑटो मोडवर सेट करताच एसीचा ड्राय मोड, कूल मोड आणि हीट मोडही सुरु होतो. एसीचा ऑटो मोड तापमानानुसार वेग आणि कुलिंग स्वत:हून सेट करतो. एसीचा फॅन केव्हा सुरु होईल, कंप्रेसर कधी चालू होईल आणि कधी बंद होईल हे एसीचा ऑटो मोड सेट करते. हा मोड खोलीतील तापमानावर सतत लक्ष ठेवते. त्यानुसार सेंटिग्ज ऑन करते.

Air Conditioner, Reduce Your AC Bill This Summer
Parenting Tips : पालकांच्या या चुकांमुळे मुले बोलतात बोबडे, वेळीच घ्या काळजी

3. यामुळे येईल वीज बिल कमी

जेव्हा खोलीचे तापमान जास्त असते. तेव्हा एअर कंडिशनरचा ऑटो मोड कंप्रेसर ऑन करतो. जेव्हा खोली थंड होते तेव्हा कम्प्रेसर बंद होतो. खोलीतील हवेत ओलावा असताना एसीचा ऑटो मोड डिह्युमिडिफिकेशन मोड सक्रिय करतो. एसीचा ऑटो मोड एसी सतत चालू ठेवत नाही ज्यामुळे वीज बील वाचण्यास मदत होते. हा मोड स्प्लिट आणि विंडो एसी दोघांमध्ये येतो. त्यामुळे नवीन एसी खरेदी करत असाल तर या गोष्टींचा विचार करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com