Vodafone Idea New Recharge
Vodafone Idea New Recharge Saam Tv

VI चा धमाकेदार प्लान! दिवसाला ६ तास फ्रीमध्ये वापरा अनलिमिटेड डेटा, ऑफर पाहा

Vodafone Idea New Recharge : VI च्या या प्लानमध्ये अनेक योजना आहेत. व्होडाफोन आयडियाने डिस्ने प्लस हॉटस्टार प्लान, हिरो अनलिमिटेड प्लान आणि कॉम्बो प्लान यांसारखे अनेक प्रकारचे रिचार्ज प्लान आणले आहेत.
Published on

Vodafone Idea Recharge :

Jio, Airtel आणि VI या भारतातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. व्होडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा नवा रिचार्ज प्लान आणला आहे. कंपनी सतत आपल्या ग्राहकांना स्वस्त आणि योजना ऑफर करते.

सध्या कंपनीने प्रीपेड आणि पोस्टपेड योजना ऑफर केल्या आहेत. VI च्या या प्लानमध्ये अनेक योजना आहेत. व्होडाफोन आयडियाने डिस्ने प्लस हॉटस्टार प्लान, हिरो अनलिमिटेड प्लान आणि कॉम्बो प्लान यांसारखे अनेक प्रकारचे रिचार्ज प्लान आणले आहेत. अशातच VI ने दिवसाला ६ तास फ्रीमध्ये अनलिमिटेड डेटा वापरता येईल असा रिचार्ज प्लान आणला आहे. जाणून घेऊया किंमत (Price)

व्होडाफोन आयडीया च्या लिस्टमध्ये ३१९ रुपयांचा प्लान आणला आहे. ही योजना कमी किमतीत अनेक फायदे देईल. या प्लानमध्ये युजर्सला अनेक गोष्टी ऑफर (Offer) केल्या आहेत. तसेच यात चित्रपट आणि ओटीटी प्लार्टफॉर्मचे सबस्क्रिप्शनही मिळणार आहे.

Vodafone Idea New Recharge
Jio Recharge Plan: Jio चा धमाकेदार प्लान! दिवसाला खर्च करा ५ रुपये, अनलिमिटेड कॉल्स मिळेल जबरदस्त डेटा; ऑफर पाहा

1. डेटासह फ्रीमध्ये एसएमएस सुविधा

३१९ रुपयांच्या या प्लानमध्ये कंपनी युजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. या रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना १ महिन्यांची वैधता दिली जात आहे. यामध्ये तुम्ही दिवसाला २ जीबी डेटा वापरु शकता. यामध्ये मोफत एसएमएसची सुविधा देखील मिळेल. कंपनी दररोज १०० एसएमएसची मोफत सुविधा देते आहे.

Vodafone Idea New Recharge
Vodafone-Idea ची धमाकेदार ऑफर! 500 रुपयांत अनिलिमेटड कॉलिंग, दिवसाला 2.5 GB डेटासह Disney+ Hotstar चे subscription फ्री

2. प्लानमध्ये बिंज ऑल नाईट ऑफर देतेय

तुम्हाला VI च्या या रिचार्ज प्लानमध्ये अधिक इंटरनेट वापरायचा असेल तर ही योजना चांगली आहे. यामध्ये Binge All Night ची सुविधा मिळते आहे. ज्यामध्ये तुम्ही ६ तास फ्रीमध्ये अनलिमिटेड डेटा वापरु शकता. ही फ्रीमधली ऑफर मध्यरात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत मिळेल. यासोबतच VI च्या वापरकर्त्यांना वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा देखील मिळते आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com