Parenting Tips : पालकांच्या या चुकांमुळे मुले बोलतात बोबडे, वेळीच घ्या काळजी

Child Care Tips : घरात मुलं जन्माला आले की, कुटुंबाचा आनंद गगनात मावत नाही. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक केले जाते. बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर रांगणं, चालणं, बोलणं या सगळ्याचीच घरचे लोक वाट पाहत असतात.
Parenting Tips
Parenting Tips Saam Tv
Published On

Speech Disorder In Kids :

घरात मुलं जन्माला आले की, कुटुंबाचा आनंद गगनात मावत नाही. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे कौतुक केले जाते. बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर रांगणं, चालणं, बोलणं या सगळ्याचीच घरचे लोक वाट पाहत असतात.

मुले बोबड्या भाषेत बोलू लागली की, कुटुंबीयांमघ्ये आनंगाते वातावरण पसरते. बाळ जसजसे मोठे पालकांना (Parents) त्याचा आनंद जास्त होतो. परंतु, काही मुलांना वयाच्या २-३ वर्षापर्यंतही नीट बोलता येत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्याच्या तोंडातून आई-बाबा शिवाय इतर शब्द पटकन निघत नाही. त्यामुळे मुले (Child) उशीरा बोलू लागतात.

मुलांना उशिरा बोलणे किंवा न बोलण्याची सवय पालकांच्या काही चुकांमुळे कारणीभूत ठरु शकतात याची कारणे काय? पालकांनी काय काळजी (Care) घ्यायला हवी. जाणून घेऊया.

Parenting Tips
Mahashivratri 2024 : पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास करताय? या गोष्टी लक्षात ठेवा

1. खाण्यापिण्याची काळजी

जेव्हा मुले ६ महिन्यांची होतात तेव्हा पालक त्यांना प्युरीच्या स्वरुपात अन्नपदार्थ खाऊ घालतात. मुलांना या पदार्थांची सवय होते. वाढत्या वयानुसार मुलांना अन्नपदार्थ चावण्याची किंवा गिळण्याची सवय लागत नाही. अन्न पदार्थ खाल्ल्याने कटिंग आणि च्युइंग स्नायू विकसित होत नाही. मुलाने प्रत्येक प्रकारची चव चाखली पाहिजे. मुलाचे बोलण्याचे कौशल्य लवकर विकसित होण्यास मदत होते.

Parenting Tips
Parenting Tips : पालकांच्या ४ चुकीच्या गोष्टींमुळे मुलांच्या मानसिकतेवर होतोय परिणाम, वेळीच बदला या सवयी

2. कपमधून पाणी किंवा दूध देणे

बहुतेक लोक सिरप कप किंवा बाटलीतून मुलांना दूध आणि पाणी देतात. त्यामुळे मुलांमध्ये गिळण्याची आवश्यकता विकसित होत नाही. त्यासाठी मुले वर्षाची झाल्यानंतर त्यांना ग्लासाने पाणी पाजण्याचा प्रयत्न करा.

3. मुलांना टीव्ही आणि मोबाइलपासून दूर ठेवणे

पालक मुलांना टीव्ही आणि मोबाइलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. मुलांना या गोष्टींपासून कायमचे दूर ठेवल्याने त्यांच्या संवादावर परिणाम होतो. पालक कामाच्या गडबडीत असल्यामुळे मुलांशी नीट संवाद साधत नाही. रिकाम्या वेळेत काही वेळेसाठी मुलांना टीव्ही पाहू द्या. त्यामुळे त्यांचे संवाद कौशल्य वाढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com