Acidity आणि पित्ताच्या त्रासाने हैराण आहात? डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायांनी मिळेल आराम

Acidity : अनेक तरूण-तरूणी धूम्रपान आणि मद्यपान करतात. ताणतणाव त्याचप्रमाणे उशिरा जेवण करणं या अनेक अन्य कारणांमुळे अॅसिडिटीचा त्रास अनेकांना जाणवतो.
Acidity
AciditySaam Tv
Published On

चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. या जीवनशैलीमुळे अ‍ॅसिडीटी होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याचं दिसून येतंय. हल्लीची जीवनशैली दिवसेंदिवस बदलतेय. कामाच्या व्यापामुळे जण बाहेरचे व तेलकट, तिखट पदार्थ खातात.

अनेक तरूण-तरूणी धूम्रपान आणि मद्यपान करतात. ताणतणाव त्याचप्रमाणे उशिरा जेवण करणं या अनेक अन्य कारणांमुळे अॅसिडिटीचा त्रास अनेकांना जाणवतो. या त्रासामुळे दिवसभराच्या कामकाजावरही परिणाम होतो. त्यामुळे अॅसिडिटी होऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.

Acidity
Stroke Symptoms: स्ट्रोक येण्याच्या १ महिनापूर्वी शरीरात दिसतील 'हे' बदल; अनेकजण करतात लक्षणांना इग्नोर

अ‍ॅसिडीटीची लक्षणं काय आहेत?

  • पोट आणि घशात जळजळ होणं

  • अस्वस्थ वाटणं

  • आंबट ढेकर येणं

  • तोंडाची चव चाणं

  • बद्धकोष्ठतेचा त्रास होणं

Acidity
Constipation Problem: कॉन्स्टिपेशनने हैराण, पोट साफ होत नाही? रात्री झोपण्यापूर्वी करा 'या' गोष्टी, घरगुती उपाय करतील आतडी स्वच्छ

काय उपाययोजना कराव्या?

  • मसालेदार अन्नपदार्थ खाणे टाळावे.

  • आहारात जास्तीत जास्त भाज्या व फळांचा समावेश करावा.

  • भरपूर पाणी व द्रव्य पदार्थांचे सेवन करून शरीर हायड्रेट ठेवावे.

  • अन्न चावून सावकाश खावे. जेवणानंतर लगेच झोपू नये.

  • जेवण व झोप वात कमीत कमी तीन तासांचे अंतर असणे गरजेचे आहे.

  • तुळशीची पाने, लवंग, बडीशेप इत्यादी पदार्थाचे सेवन करावे.

Acidity
देशात हायपोथायरॉइडिझम आणि अ‍ॅनिमियाचं प्रमाण वाढतंय; 10 व्यक्तींपैकी 1 जण 'या' समस्यांनी ग्रस्त

यासंदर्भात डॉ. बळिराम बागल म्हणाले की, खाल्लेलं अन्न पचन व्हावं, यासाठी पित्ताचे प्रमाण शरीरात तयार होत असतं. परंतु अवेळी झोप, अवेळी जेवण, चहा, मद्य अशा गोष्टींचे सेवन केल्याने पित्ताचे प्रमाण नियंत्रणाबाहेर वाढते. त्यामुळे यातूनच अॅसिडिटीचा त्रास सुरू होतो.

Acidity
Cervical Cancer Awareness Month 2025: सर्व्हायकल कॅन्सर असल्यास महिलांमध्ये दिसतात 'ही' लक्षणं; तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?

पित्त जास्त वाढलं की, आपल्या अन्ननलिकेवर सूजही येते. सध्या संशोधनातून हे सिद्ध झाले की, धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनमामुळेही अॅसिडिटी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हे नियंत्रणात ठेवायचं असेल तर वेळेवर आहार, पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे, असंही डॉ. बागल म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com