Cervical Cancer Awareness Month 2025: सर्व्हायकल कॅन्सर असल्यास महिलांमध्ये दिसतात 'ही' लक्षणं; तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?

Cervical Cancer Awareness Month : तुम्हाला ही लक्षणं आढळून आल्यास डॉक्टराचा सल्ला घ्या. एखादी व्यक्ती अनेकांशी अनौपचारिक लैंगिक संबंध ठेवत असेल तर तिने पॅप स्मिअर चाचणी करून घेणं महत्त्वाचं आहे.
Cancer
CancerSaam tv
Published On

सर्व्हायकल कॅन्सर हा आपल्या देशात सर्वाधिक प्रमाणात सापडणाऱ्या एक आहे. सर्व्हायकल कॅन्सरचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत असले, तरीही त्याचा अर्थ आता आपण त्याबद्दल जागरुक राहण्याची गरज संपली आहे असा होत नाही. सर्व्हायकल कॅन्सरच्या म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरच्या काही सर्वाधिक महत्त्वाच्या लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे दोन मासिक पाळ्यांच्या दरम्यानच्या काळात, पाळी संपून अनेक दिवस होऊन गेल्यानंतरही आणि लैंगिक क्रियेनंतर होणारा रक्तस्त्राव.

तुम्हाला ही लक्षणं आढळून आल्यास डॉक्टराचा सल्ला घ्या. एखादी व्यक्ती अनेकांशी अनौपचारिक लैंगिक संबंध ठेवत असेल तर तिने पॅप स्मिअर चाचणी करून घेणं महत्त्वाचं आहे. कारण सर्व्हायकल कॅन्सरचे हे सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारे कारण आहे.

वाशीच्या फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमधील डॉ. शिशिर एन शेट्टी यांनी सांगितलं की, १६ वर्षांखालील मुलींचं लसीकरण करण्याचा सल्ला आम्ही देतो. कारण सर्व्हायकल कॅन्सर हा ह्युमन पापिलोमा व्हायरस (HPV)मुळे होऊ शकतो. हा विषाणू लैंगिक संबंधांतून संक्रमित होतो आणि लसीकरणाद्वारे असे संक्रमण रोखता येऊ शकते. या आजाराची रक्तस्त्रावाखेरीज इतर विशिष्ट लक्षणे दिसून येत नाहीत.

Cancer
Uterine Cancer : गर्भाशयाच्या कॅन्सरच्या सुरुवातीला महिलांच्या शरीरात दिसतात 'हे' मोठे बदल, अधिकतर महिला करतात इग्नोर

डॉ. शेट्टी पुढे म्हणाले की, परंतु रक्तस्त्राव हा वयोवृद्ध स्त्रियांच्या तुलनेत विशेषत्वाने रजोनिवृत्तीपूर्व काळातील महिला किंवा अधिक तरुण लोकसंख्यागटातील महिलांसाठी चिंतेची प्रमुख बाब आहे. वाढत्या वयाबरोबर सर्व्हायकल कॅन्सरचा धोका कमी होत जातो. मात्र पूर्णपणे नाहीसा होत नाही. म्हणूनच कोणत्याही प्रकारे अनपेक्षित स्पॉटिंग झाल्यास किंवा रक्तस्त्राव झाल्यास तज्ज्ञांकडून तपासणी झाली पाहिजे.

Cancer
Blood in Stool: वारंवार शौचातून रक्तस्राव होतोय? काय असू शकतात कारणं, दुर्लक्ष करू नका!

न्यूबर्ग अजय शाह लेबोरेट्रीचे डॉ. अजय शाह यांनी सांगितलं की, गर्भाशयाचा कर्करोग अनेकदा शांतपणे विकसित होतो. त्यामुळे महिलांनी त्याची सुरुवातीची लक्षणं लक्षात घेऊन आणि वेळीच वैद्यकीय मदत घेणं आवश्यक असते. मासिक पाळी दरम्यान, संभोगानंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव यासारखे योनीतून होणारे असामान्य रक्तस्त्राव हे सुरुवातीच्या सामान्य लक्षणांपैकी एक लक्षण आहे.

Cancer
Stomach Ulcer: पोटात अल्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'हे' बदल; ९९% लोकं करतात इग्नोर

इतर लक्षणांमध्ये योनीतून होणारा, पाण्यासारखा, रक्ताळलेला किंवा दुर्गंधीयुक्त रक्तस्त्राव, ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता असू शकते. संभोगादरम्यान वेदना आणि सतत पाठ, ओटीपोट किंवा पाय दुखणे हे देखील गर्भाशयाच्या मुखाच्या प्रगत समस्या असल्याचे संकेत आहेत, असंही डॉ. शाह यांनी सांगितलंय.

Cancer
Blood Sugar Level: जेवणानंतर तुमची ब्लड शुगर लेवल किती असली पाहिजे? कोणत्या पातळीला असतो डायबेटीजचा धोका?

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग वाढत असताना, लघवी करण्यास त्रास होणे, मलविसर्जनातील अनियमितता किंवा पायांवरील सूज यासारखी लक्षणे दिसू शकतात. जरी ही लक्षणं इतर आजारांशी संबंधित असली तरी त्याकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर आजारांचे निदान आणि उपचार यांसाठी विलंब होऊ शकतो. लवकर निदानासाठी नियमित पॅप स्मीअर आणि एचपीव्ही चाचण्या आवश्यक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com