देशात हायपोथायरॉइडिझम आणि अ‍ॅनिमियाचं प्रमाण वाढतंय; 10 व्यक्तींपैकी 1 जण 'या' समस्यांनी ग्रस्त

भारतामध्ये ४.२ कोटी लोकांना थायरॉइडचा त्रास आहे. हायपरथायरॉईडिझमग्रस्त व्यक्तींपैकी ४१.८ टक्‍के व्यक्ती या बरेचदा हायपरथायरॉइडिझमचे पहिलं लक्षण असणाऱ्या अॅनिमियाने प्रभावित असल्याचे दिसते.
hypothyroidism and anemia
hypothyroidism and anemiasaam tv
Published On

हायपोथायरॉइडिझम आणि अॅनिमिया यो दोघांचाही ताण वाढत आहे. १५ ते ४९ वर्षे वयोगटातील स्त्रियांमधील अॅनिमियाचे प्रमाण २०१५-१६ मधील ५३ टक्‍के वरून २०१९-२० मध्ये ५७ टक्‍के वर पोहोचले. भारतामध्ये ४.२ कोटी लोकांना थायरॉइडचा त्रास आहे. हायपरथायरॉईडिझमग्रस्त व्यक्तींपैकी ४१.८ टक्‍के व्यक्ती या बरेचदा हायपरथायरॉइडिझमचे पहिलं लक्षण असणाऱ्या अॅनिमियाने ग्रस्त असल्याचे दिसते.

रक्तातील तांबड्या पेशींची संख्या सर्वसामान्य आकड्यापेक्षा कमी भरणं हे लक्षण असणारा अॅनिमिया बरेचदा हायपोथायरॉइडिझमच्या सोबत शरीरात प्रवेश करतो. हायपोथायरॉइडिझममध्ये तुमच्या मानेमध्ये स्थित फुलपाखराच्या आकाराची थायरॉइड ग्रंथी पुरेशा प्रमाणात थायरॉइड संप्रेरके निर्माण करू शकत नाही. ही संप्रेरके अत्यंत महत्त्वाची असतात.

hypothyroidism and anemia
Constipation Problem: कॉन्स्टिपेशनने हैराण, पोट साफ होत नाही? रात्री झोपण्यापूर्वी करा 'या' गोष्टी, घरगुती उपाय करतील आतडी स्वच्छ

हिवाळ्यामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी आणि तापमान नियमित करण्यासाठी शरीराकडून जादा थायरॉइड संप्रेरकांची मागणी केली जाते. परिणाम यामुळे वजन वाढणं, थकवा, नैराश्य, कोरडी आणि खरबरीत त्वचा आणि केस, थंडी सहन करणं कठीण होणं आणि हातांमध्ये मुंग्या येणं यांसारखी सर्वसामान्य लक्षणं जाणवू शकतात. स्त्रियांना हायपरथायरॉइझमची शक्यता पुरुषांच्या तुलनेत तीन पट असते.

या दोन आजार एकमेकांशी कशाप्रकारे जोडलेले आहेत?

थायरॉइडची पातळी खाली गेली की तांबड्या रक्तपेशी बनण्याची प्रक्रिया मंदावतेय हायपोथायरॉइडिझम किंवा होशिमोटोज थायरॉयडायटिससारख्या थायरॉइड आजारांच्या परिणामी ही प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची बनते. या स्थितींच्या परिणामी बरेचदा बी१२ या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळेही तांबड्या रक्तपेशी बनण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

त्यात थायरॉइडच्या खालावलेल्या पातळीचा लोह खनिज रक्तात शोषल्या जाणाऱ्या क्रियेत हस्तक्षेप होतो, ज्यातून चयापचयाशी निगडित विविध प्रक्रियांमध्ये व्यत्यय येतो. दोन्ही समस्यांपैकी कोणत्याही एका समस्येवर उपचार न झाल्यास हे प्रश्न अधिकच गंभीर बनू शकतात आणि त्यातून या स्थितीचे व्यवस्थापन अधिकच कठीण बनू शकते.

hypothyroidism and anemia
Swelling In Lungs: फुफ्फुसांना सूज आल्यावर शरीर देतं 'हे' मोठे संकेत; लक्षणं ओळखून वेळीच डॉक्टरांची घ्या मदत

अबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स हेड डॉ. रोहिता शेट्टी म्हणाल्या, “हायपोथायरॉइडिझम आणि अॅनिमिया या भारतातील आरोग्यसमस्या आहेत. मात्र वेळेवर निदान आणि सातत्यपूर्ण उपचार यांच्या मदतीने त्यांचे प्रभावी व्यवस्थापन करणं शक्य आहे. अधिकाधिक लोकांना या दोन स्थितींमधील संबंधाविषयी शिक्षित करणं आणि लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तत्परतेने वैद्यकीय सल्ला घेण्यास प्रोत्साहित करणे हा या समस्येवरील महत्वाचा उपाय आहे.

hypothyroidism and anemia
Blood in Stool: वारंवार शौचातून रक्तस्राव होतोय? काय असू शकतात कारणं, दुर्लक्ष करू नका!

याबाबत करुणा हॉस्पिटल, भक्तीवेदांत हॉस्पिटल, मुंबईतील कन्सल्टन्ट एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. अमेय जोशी म्हणाले, “आज, हायपोथायरॉइडिझम आणि अॅनिमिया या दोन्ही आजारांचा ताण वाढतोय. उदाहरणार्थ, १५ ते ४९ वर्षे वयोगटीत स्त्रियांमधील अॅनिमियाचे प्रमाण २०१५-१६ मध्ये ५३ टक्‍के होते, ते वाढून २०१९-२०२१ मध्ये ५७ टक्‍के झाले आहे. लोकांनी या दोन स्थितींमधील नातं समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे निदानास मदत होईल आणि सुयोग्य सल्ला तसंच उपचारांची हमी मिळू शकेल.”

hypothyroidism and anemia
Stroke Symptoms: स्ट्रोक येण्याच्या १ महिनापूर्वी शरीरात दिसतील 'हे' बदल; अनेकजण करतात लक्षणांना इग्नोर

कोणी चाचणी केली पाहिजे?

  • स्त्रिया (विशेषत: गरोदर स्त्रिया)

  • वयोवृद्ध व्यक्ती

  • ऑटोइम्युन आजार (सेलिअॅक किंवा क्रॉह्नस डिजिजसारखे) असलेल्या व्यक्ती

  • पोषणाची कमतरता असलेल्या व्यक्ती (बी१२ ते डी यासारखी अनेक जीवनसत्त्वे, लोह व इतर पोषक घटक)

  • दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्ती (जसे की मधुमेह, क्रॉनिक किडनी डिजिज व यकृताचा आजार)

  • दीर्घकाळापासून असेलली अॅसिडीटी आणि पचनाच्या समस्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com