

Monsoon Magic With Toyota : टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने ग्राहकांना सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी व पावासाळ्यातील प्रवास सुखकर होण्यासाठी विशेष सवलती व सुविधा ऑफर करत असते.
अशातच टोयोटो कंपनीने मान्सून मॅजिक विथ टोयोटाची घोषणा केली आहे. यामध्ये जुलै २०२३च्या संपूर्ण महिन्यासाठी पश्चिम राज्यांमध्ये सर्वसमावेशक वाहन आरोग्य तपासणी पासून ते घरोघरी सेवा देणे उपलब्ध केले आहे.
सुरक्षितता, चांगल्या दर्जाची उत्पादने व उत्कृष्ट सेवाचा अनुभव यासाठी कंपनीने काही नवीन योजना आखल्या आहेत. त्यासाठी कंपनीने 'मान्सून मॅजिक विथ टोयोटा' असे उपक्रमांपैकी एक आहे. हे कॅम्प महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात आणि गोव्यातील सर्व टोयोटा डीलरशिपवर लागू आहे. त्यात चांगले पॅकेजेस व ऑफर ग्राहकांना मिळणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया
मोफत 10-पॉइंट सर्वसमावेशक मान्सून वाहन आरोग्य तपासणी
टायर आणि बॅटरी सेवांवर ऑफर
देखभाल सेवांवर विनामूल्य ऑईल फिल्टर
बॉडी आणि पेंट लेबर चार्जेसवर विशेष 10% सूट
कार केअर ट्रीटमेंटवर आकर्षक ऑफर (Offer)
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे जनरल मॅनेजर असोसिएट/हेड ऑफ वेस्टर्न रिजन या उपक्रमाबद्दल राजेश मेनन बोलताना म्हणाले, आम्हाला आमच्या ग्राहकांना चांगल्या व सुरक्षित प्रकारच्या सोयी द्यायच्या आहेत. त्याच्या उद्देशाने 'मान्सून मॅजिक विथ टोयोटा' ची घोषणा करताना आनंद होत आहे.
पावसाळ्यात (Monsoon) त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यांसाठी आम्ही ग्राहकांना लक्षात ठेवून हा कॅम्प ठरवला आहे. यामुळे त्यांना पावसाचा आनंदही घेता येईल व त्यांचा प्रवासही अधिक मजेशीर होईल. पावसाळ्यात पश्चिम विभागातील ग्राहकांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे.
1. कोणत्या ग्राहकांना मिळेल याचा लाभ
इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर, लिजेंडर, ग्लान्झा, अर्बन क्रूझर हायराइडर, इनोव्हा हायक्रॉस, वेलफायर आणि हिलक्स या संपूर्ण उत्पादनाच्या श्रेणीवर ऑफर लागू आहेत. अधिक तपशीलांसाठी ग्राहक त्यांच्या जवळच्या अधिकृत टोयोटा डीलरशीपशी संपर्क साधू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.