Tourism in Maharashtra : महाराष्ट्रातील अद्भुत आणि डोळ्यांचं पारणं फेडणारे हिल स्टेशन; एकदा तरी नक्की भेट द्या

Best Hill Stations in Maharashtra : वीकेंडला बाहेर फिरण्याचा प्लान करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि सुंदर हिल स्टेशन्सची यादी शोधली आहे.
Best Hill Stations in Maharashtra
Tourism in MaharashtraSaam TV
Published On

भारतात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. सर्वांनाच फिरायला खूप आवडत असतं. रोजच्या या धावपळीच्या जीवनात सगळ्यांनाच आपला वीकेंड एन्जॅाय करायचा असतो. त्यासाठी लोकांचे विविध प्लान्स बनत असतात. तर काही लोकं बजेट फ्रेंडली ठिकाणे शोधून निसर्गसौंदर्याचा आस्वाद भेटेल अशी ठिकाणे शोधत राहतात.

आपल्याला आपली ही छोटी ट्रिप आनंदाने एन्जॅाय करता यावी, त्यासाठी सुट्टीच्या दिवशी बाहेर गर्दी कमी असल्यास किती बरं होईल असं सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही हिल स्टेशनची माहिती देणार आहोत. ज्याने इथलं सुंदर वातावरण पाहून तुमचं मन आनंदी आणि फ्रेश राहील. म्हणूनच तुम्ही पण एका जवळच्या हिल स्टेशनला नक्की भेट द्या.

Best Hill Stations in Maharashtra
Antop Hill firing : ॲन्टॉप हिल गोळीबार प्रकरणामागे कोविडकाळात सोडलेला सराईत गुन्हेगार; डोंबिवलीत बसला होता लपून

महाराष्ट्रातील हिल स्टेशन

पुणे

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक डोंगराळ परिसर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील हिल स्टेशनच्या यादीत पुण्याचं नाव आग्रहाने घ्यावं लागेल. संपूर्ण राज्यात सर्वाधिक हिल स्टेशन पु्ण्यात आहेत. पुण्याच्या सर्वात जास्त हिल स्टेशनच्या यादीत लोणावळ्याचा उल्लेख अपूर्ण आहे. पुणे शहराच्या वाढत्या लोकप्रियतेचे हे प्रमुख कारण आहे.

लोणावळा

महाराष्ट्राच्या थंड हवेच्या ठिकाणांत लोणावळा हे एक प्रसिध्द ठिकाण आहे. हे हिल स्टेशन पुणे जिल्ह्यात मोडतं. सुमारे ६२४ मीटर उंचीवर हे ठिकाण आहे. लोणावळा उंचावर असल्याने हे ठिकाण पावसाळ्यातील धबधब्यांमुळे आणि निसर्गरम्य वातावरणामुळे खूप आकर्षक दिसते. अनेक धबधबे , गुहा, ट्रेकिंग असल्यामुळे लोणावळा हे निसर्गप्रेमींचे आवडते ठिकाण बनले आहे. लोणावळा फिरण्यासाठी १-२ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे. या हिल स्टेशनला भेट देत असताना तुम्ही त्या बरोबर अनेक ठिकाणे फिरु शकता. जसे की, भुशी डॅम, पवना धरण, तुंगार्ली तलाव या थंड हवेच्या ठिकाणाला तुम्ही वर्षभरात कधीही भेट देऊ शकता.

माथेरान

हिरव्यागार सह्याद्रीच्या पार्श्वभूमीवर माथेरान हे हिल स्टेशन आहे. माथेरान हे ठिकाण मुंबईजवळील कर्जत तालुक्यात येतं. सुमारे ८०० मीटर उंचीवर हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव इको-फ्रेंडली हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशन पर्यटकांना आनंदी राहण्यास मदत करते. माथेरान फिरण्यासाठी ३-४ दिवसांचा कालावधी भरपूर आहे. माथेरानला आल्यावर तुम्ही इको पॅाइंट, लुईसा पॅाइंट, पॅनोरमा पॅाइंट या स्थळांना भेट देऊ शकता.

महाबळेश्वर

महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे सर्वोत्तम हिल स्टेशन म्हणून प्रसिध्द आहे. स्ट्रॅबेरीच्या सुंगधाने माथेरान अनेक पर्यटकांना आकर्षित करत असते. महाबळेश्वरला तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भेट द्यायला जाऊ शकता. हे हिल स्टेशन केट पॅाइंट, एलिफंट पॅाइंट, वेन्ना लेक, चायनामन धबधबे यांसारख्या प्रमुख दृश्यांसाठी आकर्षित आहे. माथेरानला गेल्यावर तुम्ही माउंटन बाइकिंग, रॅाक क्लाइंबिंग, निसर्ग ट्रेल्स , घोडेस्वारी यांसारख्या गोष्टी करु शकता. हे प्रेक्षणीय स्थळ फिरण्यासाठी डिसेंबर ते जानेवारी हा सुंदर काळ आहे.

खंडाळा

लोण्यावळ्यापासून अगदी जवळ खंडाळा हे ठिकाण आहे. खंडाळा हे हिरवेगार जंगल , धुके असलेल पर्वत, धबधबे यांसारख्या सुंदर दृश्यांसाठी ओळखले जात आहे. हे हिल स्टेशन फिरण्यासाठी २-४ दिवस पुरेसे आहे. खंडाळा हे सर्वात स्वच्छ आणि रोमँटिक हिल स्टेशन पैकी एक आहे. कुणे फॅाल्स, डेला अॅडव्हेंचर पार्क, भोर घाट, राजमाची पॅाइंट यांसारख्या स्थळांना तुम्ही खंडाळा फिरताना भेट देऊ शकता. हे हिल स्टेशन अनेक पर्यटकांसाठी उत्तम निवासस्थान आहे.

Best Hill Stations in Maharashtra
Navapur Hill Fire : नवापूर तालुक्यातील माकडदरीच्या डोंगराला आग; दोन दिवसांपासून वणवा पेटलेला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com