Navapur Hill Fire : नवापूर तालुक्यातील माकडदरीच्या डोंगराला आग; दोन दिवसांपासून वणवा पेटलेला

Navapur news : सुरत- नागपुर महामार्गावरील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या अगदी समोरच असलेल्या या जंगलात गेल्या दोन दिवसांपासून पेटत असलेल्या वनव्याने धुराचे लोळ दिसून येत आहे
Hill Fire
Hill FireSaam tv

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील मोरकरंजा गावाजवळील माकडदरीच्या डोंगराला आग (Fire) लागल्याचे चित्र आहे. याठिकाणी जंगलात वणवा पेटल्याने दोन दिवासंपासून आग घुमसत असल्याचे चित्र (Nandurbar) आहे. हा वणवा विझविण्याचा प्रयत्न सुरु आहे. (Live Marathi News)

Hill Fire
Nandurbar Video Viral : वाहनचालकाची पोलिसांना दमदाटी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सुरत- नागपुर महामार्गावरील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या अगदी समोरच असलेल्या या जंगलात गेल्या दोन दिवसांपासून पेटत असलेल्या (Navapur) वनव्याने धुराचे लोळ दिसून येत आहे. डोंगरावरील सुकलेले गवत आणि झांडाच्या पालापाचोळ्यामुळे लागलेला वनवा हा चटकण पसरत असल्याचे चित्र आहे. आग पसरत असल्याने डोंगर परिसरातील गावांमध्ये देखील थोडी भीती निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी देखील आजूबाजूच्या परिसरातील गावकरी जागून राहत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Hill Fire
नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, केंद्राच्या कांदा खरेदी याेजनेला शेतक-यांचा विराेध

आग विझविण्याचे प्रयत्न सुरूच 

डोंगरातील वनवा विझवण्यासाठी वन मजूर, स्थानिक गावकरी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. मात्र मागील दोन दिवसांपासून लागलेली हो आग विझविणे कठीण जात आहे. दरम्यान अशा पद्धतीने वनवे पेटू नये; यासाठी (Forest Department) वनविभागाने उपाययोजा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com