नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, केंद्राच्या कांदा खरेदी याेजनेला शेतक-यांचा विराेध

यंदापासून पैसे थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पोर्टलद्वारे नोंदणी करावी लागणार आहे.
nafed nccf to purchase 5 lakh ton onion farmers opposed decision
nafed nccf to purchase 5 lakh ton onion farmers opposed decision Saam Digital
Published On

Nashik :

नाफेड (NAFED), एनसीसीएफ या दाेन संस्थांच्या माध्यमातून ५ लाख टन उन्हाळ कांदा खरेदी करणार आहे. ही कांदा खरेदी थेट बाजार समितीतून होत नसल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याबाबतची माहिती भारत दिघोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)

भारत दिघोळे म्हणाले केंद्र सरकार बफर स्टाॅकसाठी ५ लाख टन कांदा खरेदी करणार आहे. - मात्र यावेळी कांदा दराबाबत मौन बाळगण्यात आले आहे. यंदापासून पैसे थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना पोर्टलद्वारे नोंदणी करावी लागणार आहे.

nafed nccf to purchase 5 lakh ton onion farmers opposed decision
Shirdi News: साईभक्‍तांसाठी आनंदाची बातमी; भाविकांसाठी बुधवारी साई मंदिर रात्रभर राहाणार खुले

दरम्यान नाफेड, एनसीसीएफ मार्फत केली जाणारी कांदा खरेदी थेट बाजार समितीतून हाेणे गरजेचे आहे. ती होत नसल्याने शेतकऱ्यांनी निर्णयास तीव्र विरोध दर्शविला आहे असे दिघाेळेंनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उन्हाळ कांदा खरेदी करण्याऐवजी केंद्रानं कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केंद्र सरकारला केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

nafed nccf to purchase 5 lakh ton onion farmers opposed decision
Success Story : पठ्ठ्यानं करुन दाखवलं! कोकणात कलिंगड शेतीतून मिळविले लाखाेंचे उत्पन्न; वाचा नाईकांची यशाेगाथा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com