Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

Nandurbar Video Viral : वाहनचालकाची पोलिसांना दमदाटी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Nandurbar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असून वाहनांची तपासणी केली आहे. यात काही संशयास्पद आढळून आल्यास पोलिसांकडून कारवाई देखील केली जात आहे.

सागर निकवाडे 

नंदूरबार : नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसाला वाहन चालकाकडून (Nandurbar) दमदाटी करण्यात आल्याची घटना घडली आहे. वाहन चालक वाहतूक पोलिसाला (traffic Police) हातवारे करून दमदाटी करीत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.  (Latest Marathi News)

Nandurbar News
Shirdi News: साईभक्‍तांसाठी आनंदाची बातमी; भाविकांसाठी बुधवारी साई मंदिर रात्रभर राहाणार खुले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांची (Police) नाकाबंदी असून वाहनांची तपासणी केली आहे. यात काही संशयास्पद आढळून आल्यास पोलिसांकडून कारवाई देखील केली जात आहे. अशाच प्रकारे (Dondaicha) दोंडाईचाहून धुळे चौफुली मार्गे बायपास रस्त्याकडे भांड्यांचे रॅक घेऊन जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला थांबवून वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी वाहतूक पोलिसाने गाडी अडवली. यावेळी वाहन चालकाने थेट वाहतूक पोलिसालाच अरेरावी करीत दमदाटी करण्यास सुरवात केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar News
Pune News: उन्हामुळे पिक जळालं; कर्जबाजारीपणाला कंटाळून 45 वर्षीय शेतकर्‍याची आत्महत्या, परिसरात हळहळ

व्हिडीओ झाला व्हायरल 

गाडी थांबविल्यानंतर वाहन चालकाने पोलिसांशी अरेरावी करण्यास सुरवात केली. यामुळे मार्गावर गोंधळ निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी देखील झाल्याचे पाहण्यास मिळाले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ काही जणांनी मोबाईलमध्ये कैद केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कारवाई सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com