Antop Hill firing : ॲन्टॉप हिल गोळीबार प्रकरणामागे कोविडकाळात सोडलेला सराईत गुन्हेगार; डोंबिवलीत बसला होता लपून

Mumbai Crime News : ॲन्टॉप हिल परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने विवेक चेट्टीयार या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. शनिवारी आकाश कदमवर ॲन्टॉप हिल परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता.
Antop Hill firing
Antop Hill firingSaam Digital

Antop Hill firing

ॲन्टॉप हिल परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने विवेक चेट्टीयार या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. शनिवारी आकाश कदमवर ॲन्टॉप हिल परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता, त्या प्रकरणी ॲन्टॉप हिल पोलीस तसेच मुंबई गुन्हे शाखेचं पथक चेट्टीयारच्या मागावर होतं. गुन्हे शाखचेच्या अधिकाऱ्यांना चेट्टीयार डोंबिवलीत लपून बसल्याची माहिती मिळाली त्यानंतर त्याला सापळा लाऊन अटक करण्यात आली, त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तूल, सहा जिवंत काडतूस हे आणि एक रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशने चेट्टीयारला सात लाख रुपये दिले होते मात्र ते तो परत करत नव्हता. शेवटी आकाशने चेट्टीयारच्या पत्नीशी संपर्क केला याचाच राग त्याला आल्याचा संशय आहे. चेट्टीयार सराई गुन्हेगार असून त्याच्या विरोधात खून, खूनाचा प्रयत्न अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण बारा गुन्हे नोंद आहेत. कोविडकाळात कारागृहात असताना कोविडच्या अनुषंगाने त्यांची तात्पुरती सुटका झाली होती. मात्र त्यानंतर तो जेलमध्ये परतलाच नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Antop Hill firing
Pimpri Chinchwad : बंदोबस्तावर असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना भरधाव कारनं चिरडलं, युवकास अटक

पैशांच्या देवाण-घेवाणीवरून शनिवारी सकाळी आकाश कदमवर गोळीबार झाला होता.या हल्ल्यात आकाश कदम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या घटनेनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. आसपासच्या रहिवाशांनी जखमी आकाशला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पोटात डाव्या बाजूला एक गोळी लागली आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Antop Hill firing
Nagpur News : क्रूरतेचा कळस! माथेफेरू तरुणाकडून श्वानाला अमानुष मारहाण; तरफडून मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com