Diwali Tourism: या सुंदर हिल स्टेशनवर घालवा दिवाळीची सुट्टी; निसर्गरम्य ठिकाणं पाहून मन भारावेल

Maharashtra Tourism: दिवाळीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील निसर्गरम्य हिल स्टेशन आणि सुंदर बीचला भेट द्या. कुटुंबासोबत रिलॅक्स व्हा आणि सुट्टीत निसर्गाचा आनंद लुटा.
Diwali holiday destinations Maharashtra hill stations
Diwali holiday destinations google
Published On
Summary

महाराष्ट्रात अनेक निसर्गरम्य ठिकाणं दिवाळीच्या सुट्टीसाठी योग्य आहेत.

माथेरान, महाबळेश्वर, आणि लोणावळा सारखी ठिकाणं परिवारासाठी परफेक्ट आहेत.

भंडारदरा आणि तारकर्ली कपल्ससाठी रोमँटिक स्पॉट्स आहेत.

दिवाळीत निसर्गाचा आनंद घेत सुट्टी साजरी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे हिल स्टेशन ट्रिप.

दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि सुट्टीचे दिवस! अनेक जण या दिवसात आपल्या कुटुंबासोबत थोडा निवांत वेळ घालवण्यासाठी बाहेर पडतात. महाराष्ट्रात असे अनेक सुंदर पिकनिक स्पॉट्स आहेत, जे दिवाळीच्या सुट्टीत भेट देण्यासाठी अगदी योग्य ठरतात. चला जाणून घेऊ या टॉप ७ ठिकाणांची यादी आपण जाणून घेणार आहोत. जिथे तुम्हाला धमाल मस्ती आणि दगदगीच्या जीवनापासून मिळेल सुट्टी.

पुढे तुम्हासा महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध ठिकाणांची यादी दिली आहे. तुम्ही इथे दिवाळीच्या सुट्टीत स्टे ला जाण्याचा प्लान करु शकता.

माथेरान (Matheran)

मुंबईजवळचं हे हिल स्टेशन गाड्यांविना शहर म्हणून प्रसिद्ध आहे. स्वच्छ हवा, निसर्गरम्य दृश्यं आणि घोडेसवारीचा आनंद घेण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

लोणावळा आणि खंडाळा (Lonavala–Khandala)

दिवाळीच्या सुट्टीत मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठी हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. इथे टायगर पॉईंट, भुशी धबधबा आणि स्थानिक चहाचा आस्वाद घ्या.

Diwali holiday destinations Maharashtra hill stations
Dadar Hidden Gems: जोडीदारासोबत दादरमध्ये फिरताय? मग हे Hidden स्पॉट्स करा नक्की Explore

महाबळेश्वर (Mahabaleshwar)

स्ट्रॉबेरी, डोंगररांगा आणि थंडगार हवामानासाठी प्रसिद्ध असलेलं महाबळेश्वर दिवाळीत पर्यटकांनी गजबजलेलं असतं.

भंडारदरा (Bhandardara)

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण कॅम्पिंग आणि बोटिंगसाठी बेस्ट आहे. रात्रभर आकाशातील तारे पाहत वेळ घालवणं हेच खास आकर्षण आहे. तसेच हा स्पॉट कपल्ससाठी बेस्ट आहे.

अलिबाग (Alibaug)

समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर निसर्ग आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. दिवाळीत बीचवरच्या सूर्योदयाचा आनंद वेगळाच असतो.

पाचगणी (Panchgani)

टेबललँड, गुहा आणि पॉईंट्समुळे हे ठिकाण शांत आणि रम्य वातावरण देतं. फॅमिली पिकनिकसाठी हा स्पॉट एकदम योग्य पर्याय आहे.

तारकर्ली (Tarkarli)

कोकणातील हे ठिकाण स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि बीच वॉक्ससाठी स्वर्गासारखं आहे. दिवाळीत इथले वातावरण अधिक सुंदर असते.

Diwali holiday destinations Maharashtra hill stations
Heart Attack Signs: हार्ट अटॅक येण्याआधी महिनाभर आधीच समजते, या लक्षणाकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com