Chikhaldara: हिरवा निसर्ग हा भोवतीने..., चिखलदऱ्यातील Hidden Spots पाहताच गोव्याचे सौंदर्यही पडेल फिके

Hidden Spot In Chikhaldara : हिवाळ्यात कुटुंबासोबत लाँग ट्रिप प्लान करत असाल तर, महाराष्ट्रातील 'चिखलदरा' हे बेस्ट हिल स्टेशन आहे. येथे अनेक निसर्गरम्य ठिकाणे तुम्हाला पाहता येतील.
Hidden Spot In Chikhaldara
ChikhaldaraSAAM TV
Published On

हिवाळ्यात नेहमीच्या लोणावळा, खंडाळा या हिल स्टेशनला भेट देऊन कंटाळा आला असेल तर, महाराष्ट्रातील चिखलदरा (Chikhaldara ) या हिल स्टेशनला भेट द्या. चिखलदऱ्याचे सौंदर्य आणि तेथील पर्यटन स्थळे गोव्याचे सौंदर्य तुम्हाला विसरायला भाग पाडेल. चिखलदऱ्याला सुंदर दृश्यांचा नजारा पाहायला मिळतो. चिखलदऱ्यातील काही सुंदर ठिकाणांची यादी नोट करून घ्या.

गुगामल राष्ट्रीय उद्यान

तुम्हाला जर या पिकनिकमध्ये मुलांना प्राणी-पक्षांची दुनिया जवळून दाखवायची असेल तर गुगामल राष्ट्रीय उद्यानाला आवर्जून भेट द्या. गुगामल राष्ट्रीय उद्यान हे वन्यजीवांसाठी ओळखले जाते. येथे तुम्हाला हरीण, बिबट्या, सिंह यांच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहायला मिळतील. प्राणी प्रेमींसाठी हे बेस्ट ठिकाण आहे.

भीमकुंड पॉइंट

चिखलदरा येथील भीमकुंड पॉइंट हा पर्यटकांचे आकर्षण आहे. भीमकुंड पॉइंट म्हणजे डोंगराच्या मधोमध एक मोठा तलाव होय. ज्याला भीमकुंड नावाने ओळखले जाते. असे बोले जाते की, हे ठिकाण ब्रिटिश काळापासून येथे आहे.

Hidden Spot In Chikhaldara
Photography : फोटोग्राफी प्रेमींनी भारतातील 'या' ठिकाणांना आवर्जून भेट द्या, निसर्गाचे अद्भुत सौंदर्य अनुभवा..

पंचबोल पॉइंट

चिखलदऱ्यातील सर्वात निसर्गरम्य ठिकाण म्हणजे पंचबोल पॉइंट होय. पंचबोल पॉइंटवरून तुम्हाला डोंगराळ दृश्य अनुभवायला मिळतात. हिवाळ्यात दाट धुक्याची चादर येथे पाहायला मिळते. हे ठिकाण जोडीदारासोबत फिरण्यासाठी खास आहे. पंचबोल पॉइंटच्या आजूबाजूला कॉफीचे मळे देखील आहे.

चिखलदऱ्याला कसे जावे?

चिखलदऱ्याला स्वस्तात मस्त जायचे असेल तर, रेल्वेने प्रवास करा. तुम्ही अमरावती स्टेशनला उतरून पुढे रिक्षा किंवा बसने चिखलदऱ्याला जाऊ शकता. रेल्वेचा प्रवास आरामदायी होईल. चिखलदऱ्याला आल्यावर येथे राहण्यासाठी हॉटेल्सची उत्तम सोय आहे. तसेच तेथील फूडही खूप टेस्टी आहे. तुम्हाला येथे महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेता येईल.

Hidden Spot In Chikhaldara
Konkan Travel : कोकणात दडलेल निसर्ग सौंदर्य अनुभवा अन् ताणतणावातून Relax व्हा, पावसाळ्यात बेस्ट पिकनिक स्पॉट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com