Amravati Water scarcity : पाणीटंचाईचे सावट; चिखलदरा तालुक्यातील १०० गावात टंचाई, २६ कोटींचा कृती आराखडा

Amravati News : राज्यात यंदा सर्वच जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय पाऊस कमी झाल्याने पाणी पातळी देखील खालावली असल्याने पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.
Amravati Water scarcity
Amravati Water scarcitySaam tv
Published On

अमर घटारे 

अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक भागात पाणीटंचाईचा (Water Scarcity) सामना आतापासूनच  आहे. अशाच प्रकारे अमरावती (Amravati) जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या चिखलदरा तालुक्यातील सर्वाधिक १०० गावांवर यंदा पाणी टंचाईचे मोठे सावट निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

Amravati Water scarcity
Akkalkot Bandh : अक्कलकोट बंद, अफवांना बळी पडू नका : पाेलिसांचे आवाहन

राज्यात यंदा सर्वच जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय पाऊस (Rain) कमी झाल्याने पाणी पातळी देखील खालावली असल्याने पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. अमरावती जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती असून अमरावतीच्या आदिवासी भाग असलेल्या (Chikhaldara) चिखलदरा तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये एकूण २६ टॅंकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. 

'साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati Water scarcity
Electric Shock : विजेचा धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; तर संगमनेरमध्ये विद्युत तारेला स्पर्श झाल्याने ट्रक चालकाचा मृत्यू

२१ कोटींचा कृती आराखडा

जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवत असल्याने ही पाणी टंचाई निवारण्यासाठी २१ कोटी १८ लाख ४६ हजारांचा पाणी टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. प्रशासनाचा कृती आराखडा मंजूर असून या ६७६ गावात १ हजार ३३ योजना प्रस्तावित केल्या आहेत. तर ४४० विहिरी अधिग्रहित केल्या जाणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com