Toxic People : टॉक्सिक लोकांपासून चार हात लांबच राहा अन् मानसिक आरोग्य जपा, कायम लक्षात ठेवा 'या' गोष्टी

10 Tips For How To Deal With Toxic People: आजकालच्या धावपळीच्या जगात मानसिक आरोग्य जपणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील टॉक्सिक लोकांपासून स्वतःचे रक्षण कसे करायचे आज जाणून घ्या.
Mental Health
Toxic PeopleSAAM TV
Published On

आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोक असतात. काही चांगली तर काही वाईट. चांगल्याची संगत धरून वाईटाला आपल्याला दूर ठेवायचे असते. नाहीतर आपले मानसिक आरोग्य बिघडते. आपल्या उत्तम मानसिक आरोग्यासाठी आयुष्यातील टॉक्सिक (Toxic People) लोकांपासून चार हात लांबच रहा. यामुळे तुमचे आयुष्य चांगले राहील.

आपण जेथे राहतो, काम करतो तेथे अनेक टॉक्सिक वृत्तीचे लोक आढळतात. त्यांच्यापासून दूर रहावे. कारण अशा लोकांमुळे मानसिक आणि भावनिक ताण वाढतो. आपली दैनंदिन जीवनात खूप लोकांशी ओळख होते. मात्र त्यांच्या आणि आपल्या विचारात खूप फरक असतो. विचारात बदल असणे हे स्वाभाविक आहे, पण आपल्या विचारांवर दुसऱ्यालाही चालू लावणे चुकीचे आहे. यालाच टॉक्सिक वृत्ती म्हणतात.

टॉक्सिक वृत्तीच्या लोकांशी चुकूनही मैत्री करू नये. ते तुमच्या कायमच प्रगतीच्या आड येणार. टॉक्सिक लोक तुम्हाला सर्वप्रथम मनाने कमजोर करतात , ज्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बिघडते. त्यामुळे अशा लोकांची वेळीच संगत सोडणे तुमच्या चांगल्या आयुष्यासाठी फायदेशीर आहे.

Mental Health
Eye Care Tips: वाढत्या स्क्रीन टाईममुळे सतत डोळ्यांची जळजळ होतेय? 'या' उपायांनी मिळेल आराम

टॉक्सिक लोक कसे ओळखावे?

  • टॉक्सिक लोक इतरांना त्यांच्या बोलण्यात अडकवतात आणि आपले बोलणे टाळतात.

  • टॉक्सिक लोक कायम दुसऱ्यांना दुय्यम स्थान देतात.

  • तुमच्या वैयक्तिक गोष्टी विचारून ते तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात.

  • तुम्हाला तुमच्यामधील कायम वाईट गुण दाखवतात.

  • अशी लोक छोट्या छोट्या गोष्टींचे आमिष दाखवतात.

  • टॉक्सिक लोक खूप जास्तच सेल्फ-ऑबसेस्ड असतात. त्यांचे फक्त स्वतःवर प्रेम असते.

  • अशी लोक ड्रामा करून तुम्हाला त्यांच्या बोलण्यात अडकवतात आणि आपला फायदा करून घेतात.

  • टॉक्सिक लोक तुम्हाला नियंत्रित करण्याचा कायम प्रयत्न करतात.

  • तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या वागण्यातून स्वतःसाठी नकारात्मक भावना जाणवत असतील तर त्यांच्यापासून आजच दूर व्हा.

टॉक्सिक लोकांपासून कसे दूर रहावे?

  • वर सांगितलेल्या गुणांपैकी एक जरी गुण तुमच्या जवळच्या व्यक्तींमध्ये असेल तर त्यांच्याशी बोलणे टाळा.

  • तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना त्यांना सांगू नका.

  • तसेच या लोकांचे कोणतेच बोलणे मनावर घेऊन स्वतःला मानसिक त्रास करून घेऊ नका.

  • अशा लोकांशी विशेषता भावनिकदृष्ट्या लांब रहा.

  • कधीच अशा व्यक्तींचा सल्ला घेऊ नका.

  • त्यांच्यासमोर तुमची मते रोखठोक मांडा.

Mental Health
Steroids Body: स्टेरॉईडची बॉडी बिल्डिंग, बॉडीसाठी इंजेक्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com