Eye Care Tips: वाढत्या स्क्रीन टाईममुळे सतत डोळ्यांची जळजळ होतेय? 'या' उपायांनी मिळेल आराम

Eye Care Home Remedies: धावपळीच्या जगात आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात स्क्रीनचा वापर केल्याने वारंवार डोळे जळजळत असतील तर तुम्ही घरगुती उपायांनी डोळ्यांना आराम देऊ शकता.
Eye Care Home Remedies
Eye Care TipsSAAM TV
Published On

डोळा हा आपला सर्वात नाजूक अवयव आहे. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजकाल आपण जास्तीत जास्त वेळ लॅपटॉप आणि मोबाईल समोर घालवतो. यामुळे डोळे दुखीचा त्रास सुरू होतो. डोळे लाल होतात, डोळ्यांची जळजळ होऊ लागते. तसेच डोळ्यांतून सतत पाणी येऊ लागते. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

डॉक्टरांचा सल्ला

तुमचा डोळा जास्तच दुखत (Eye Care Tips) असेल तसेच वारंवार डोळ्यातून पाणी येत असेल तर तुम्हाला डोळ्यांची मोठी समस्या असू शकते.त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच वरील कोणताही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांना नक्की विचारा, म्हणजे तुम्हाला ॲलर्जी होणार नाही.

डोळ्यांतून पाणी येण्याची इतर कारणे

  • डोळ्यांना ॲलर्जी होते.

  • डोळे कोरडे होता.

  • सतत डोळ्यांची जळजळ होते.

  • चष्माच्या नंबर जास्त असेल तर

  • चष्मा लागला असेल तर

  • डोळ्यात धुळीचे कण जातात.

Eye Care Home Remedies
Dirty Hair Brush Effects: तुम्ही घाणेरड्या कंगव्याने केस विंचरत असाल तर काळजी घ्या, 'या' समस्या उद्भवतील

घरगुती उपाय (Home Remedies)

कच्चा बटाटा

सतत डोळ्यातून पाणी येत असेल तर, कच्चा बटाट्याचे काप डोळ्यावर ५ ते १० मिनिटे ठेवा. डोळ्यांचा त्रास कमी होईल.

त्रिफळा

त्रिफळामधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुम्ही पाण्यामध्ये त्रिफळा घालून डोळे धुवा.

कोमट पाणी

डोळ्यांची वारंवार जळजळ होत असेल आणि खाज येत असेल तर, डोळ्यांना कोमट पाण्याने शेकवा. कोमट पाण्यात मीठ मिसळायला विसरू नका.

बर्फ

जास्तच डोळा दुखत असेल तर हलक्या हाताने बर्फने डोळ्यांना शेक द्या. मात्र लक्षात ठेवा जास्त थंड बर्फ घेऊ नये. यामुळे डोळ्याला आराम मिळेल.

गाजर

डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित आपल्या आहारात गाजराचा समावेश करा. यामुळे डोळ्यांची दृष्टी उत्तम राहते आणि नजर चांगली होते.

गुलाबपाणी

डोळ्यांना ॲलर्जी झाली असल्यास डोळ्यात गुलाबपाणीचे दोन थेंब घाला आणि आराम करा. यामुळे डोळे थंडावतात.

काकडी

काकडीही डोळ्यांच्या आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे. काकडीमधील दाहक विरोधी गुणधर्म डोळ्यांची जळजळ कमी करून डोळे थंड करतात. काकडीचे काप १०-१५ मिनिटे डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांवरील ताण हलका होईल.

थंड दूध

सतत डोळे दुखत असतील तर दिवसातून दोन वेळा डोळ्यात थंड दूध घालून ठेवा. यामुळे डोळ्यातील घाण निघून जाते आणि डोळा स्वच्छ होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Eye Care Home Remedies
Winter Skin Care : किचनमधला 'हा' एक पदार्थ वापरा; हिवाळ्यातही मिळेल ग्लोइंग स्कीन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com