
शरीर सौष्ठवासाठी आजवर आपण व्यायामशाळेत तासनतास घालवलेले बॉडी बिल्डर पाहिले. पण आता याच बॉडी बिल्डर्सना एक अंत्यत घातक सवय लागल्याचं दिसतंय. कमी कष्टात आणि कमी वेळात चांगली बॉडी कमावण्याच्या नादात अनेक बॉडी बिल्डर अंत्यत घातक अशा स्टेरॉईड्सचा सर्रास वापर करत असल्याचं पुण्यात दिसून आलंय. पुण्याच्या शिवाजीनगर पोलिसांनी या स्टेरॉईडची विक्री करणाऱ्या 2 जणांना बेड्या ठोकत १४ इंजेक्शन जप्त केलेत.
डॉक्टरांच्या परवानगी असल्याशिवाय मेफेटर्मिन सल्फेट या स्टिरॉइडच्या वापरावर भारतात बंदी आहे. कारण हे स्टिरॉइड आरोग्याला अत्यंत घातक आहे. या स्टिरोइडच्या वापरानं आरोग्यावर कसे परिणाम होतात पाहुया.
स्टिरॉइड्सच्या अतिसेवनाने निराशेची समस्या
स्टिरॉइड्सच्या वापरानं कॅन्सरचा धोका
स्टिरॉइड्सच्या सेवनानं उच्च रक्तदाब, दमा आणि हदयविकार
स्टिरॉइड्समुळे पुरुषांच्या हार्मोन्स सोबत प्रजननशक्तीवरही परिणाम
अतिस्टिरॉइड्समुळे अकाली मृत्यूचा धोका
स्टिरॉईड्सचा वापर हा उत्तम आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचं कायम दिसून आलंय. कारण या स्टिरॉइडमुळे बाहेरून बलदंड दिसणाऱ्या व्यक्तीचे आतील अवयव मात्र कमजोर होत असल्याचं अनेकदा पहायला मिळालंय. पुण्यात पकडले गेलेले आरोपी हे स्टिरॉइडची विक्री करत नव्हते तर चांगलं शरीर संपवणाऱ्या विषाची विक्री करत होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे शरीरसौष्ठव करतांना स्टिरॉईड विकत घेण्यापेक्षा फुकटचा घाम गाळा आणि बॉडी कमवा असं म्हणायची वेळ आलीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.