टोमॅटो केचप आपल्यातील कित्येक व्यक्ती महिन्यातून १० वेळा तरी खात असतील. भारतीय नागरिक या केचपचा उपयोग पदार्थाची चव वाढवण्यासाठी करतात. तर मिठ आणि विविध मसाल्यांप्रमाणे ब्रेड, चपाती, पराठे आणि पकोडे यांना केचप लावून खाल्ले जाते. अशात आता आम्ही तुम्हाला केचप आणखी कोणकोणत्या पदार्थासह खाता येईल याची माहिती सांगणार आहोत.
टोमॅटो केचप सॉस तुम्ही बीबीक्यू सॉसमध्ये सुद्धा बदलू शकता. त्यासाठी ब्राऊन शुगर, व्हिनेगर, वोर्सेस्टरशायर सॉस एकत्र मिक्स करून घ्या. हे सर्व टोमॅटो केचपमध्ये मिक्स करा. हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या आणि किमान 10 मिनिटे तरी उकळवा. तयार झाला होममेड बीबीक्यू सॉस.
टोमॅटो सूप बनवताना रेसिपी झटपट तयार व्हावी म्हणून तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता. यासाठी विविध भाज्या शिजवून घ्या. त्यानंतर या भाज्यां एकत्र स्मॅश करा. पुढे यात केचप मिक्स करा. तयार झालं टोमॅटो शिवाय झटपट आणि चवदार टोमॅटो सूप.
टोमॅटो केचप पास्ता सॉस बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल घ्या. त्यानंतर लसूण आणि कांदे थोड्या तेलात परतून घ्या. पुढे टोमॅटो केचपसोबत बाल्सॅमिक व्हिनेगर, मीठ आणि मिरेपुड मिक्स करा. तयार झाला टोमॅटो केचप पास्ता सॉस तुम्ही पास्ताबरोबर मनसोक्त खाऊ शकता.
महाराष्ट्रात काही व्यक्ती झटपट जेवण बनवण्यासाठी टोमॅटोची भाजी किंवा टोमॅटो चटणी सुद्धा बनवतात. आता तुम्ही सुद्धा टोमॅटो शिवाय ही भाजी बनवू शकता.त्यासाठी कांदा, लसून, अद्रक, मीठ, हळद, मिरची सर्व काही एकत्र परतून घ्या. तसेच यामध्ये टोमॅटो केचप मिक्स करा. तयार झाली झटपट टोमॅटोची भाजी.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.