

आज, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन महिन्यातील द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी आहे. मुलांचं कल्याण, पतीची प्रगती आणि कुटुंबाचे सर्व संकटांपासून रक्षण करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचं व्रत पाळलं जातं. चंद्राची पूजा केल्यानंतर संकष्टी चतुर्थीला उपवास सोडावा.
कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी, उत्तर फाल्गुनी नक्षत्र आणि सुकर्मा योग यांचा प्रभाव आज राहणार आहे. चंद्र कन्या राशीत असल्यामुळे महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं लाभदायक ठरणार आहे. संयम आणि अचूकता ठेवून केलेली कामं आज चांगले परिणाम देणार आहे. आजचं पंचांग, शुभ-अशुभ मुहूर्त काय आहेत ते पाहूयात.
तिथी: कृष्ण चतुर्थी
पक्ष: कृष्ण पक्ष
वार: गुरुवार
नक्षत्र: उत्तर फाल्गुनी
योग: सुकर्मा (06 फेब्रुवारी 12:04:31 AM पर्यंत)
करण: बव
चंद्र राशि: कन्या
ऋतु: शिशिर
सूर्योदय: 07:05:51 AM
सूर्यास्त: 06:17:15 PM
चंद्रोदय: 09:40:03 PM
चंद्रास्त: 09:11:16 AM (पुढील दिवस)
शक संवत: 1947
विक्रम संवत: 2082
मास (अमान्ता): माघ
मास (पुर्णिमान्ता): फाल्गुन
12:19:00 PM ते 01:03:00 PM
राहु काल: 02:05:28 PM ते 03:29:24 PM
यमघंट काल: 07:05:51 AM ते 08:29:46 AM
गुलिकाल: 09:53:41 AM ते 11:17:37 AM
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे एकाग्रता आणि विश्लेषण क्षमता वाढणार आहे. प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी उत्तम वेळ आहे. आरोग्य आणि दिनचर्येत सुधारणा करण्याचा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.
आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत स्थैर्य मिळणार आहे. नियोजनबद्ध गुंतवणूक किंवा बचत यावर लक्ष दिल्यास चांगले परिणाम दिसून येणार आहेत.
व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीची चिन्हं दिसून येणार आहेत. जबाबदाऱ्या यशस्वीपणे हाताळाल. दीर्घकालीन योजनांना आज योग्य दिशा मिळू शकणार आहे.
संवाद आणि समन्वयातून फायदे मिळणार आहे. बैठका, चर्चा आणि नेटवर्किंगसाठी दिवस अनुकूल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.